Breaking

शनिवार, १ ऑगस्ट, २०२०

टेंभूर्णीतील कन्या प्रशालेची उज्वल यशाची परंपरा कायम साक्षी नाळे प्रथम, दीक्षा मुसळे द्वितीय तरऋतुजा खोटे तृतीय


टेंभूर्णीतील कन्या प्रशालेची उज्वल यशाची परंपरा कायम 

साक्षी नाळे प्रथम, दीक्षा मुसळे द्वितीय तर
ऋतुजा खोटे तृतीय



टेंभूर्णी (प्रतिनिधी):- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे मार्फत मार्च २०२० मध्ये माध्यमिक शालांत इयता दहावीच्या परीक्षेत कन्या प्रशाला टेंभुर्णी (ता माढा) या प्रशालेचा इयत्ता दहावी चा निकाल 87. 75 टक्के लागलेला असून सेमी इंग्लिश चा निकाल शंभर टक्के लागलेला आहे. प्रशालेचे सालाबाद प्रमाणे उज्वल यशाची परंपरा कायम ठेवलेली आहे. या वर्षातील इयत्ता दहावीतील प्रशालेतील प्रथम तीन क्रमांक खालील प्रमाणे
१) साक्षी जालिंदर नाळे  88 .60 टक्के
२)दीक्षा खंडू मुसळे  85 .80 टक्के
३)ऋतुजा राजू खोटे 85 .60 टक्के. 

प्रशालेतील सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे व १० वीचे वर्गशिक्षक सोमनाथ नाळे यांचे संस्थेचे अध्यक्ष टी एस पाडे, संस्थेच्या सचिव सौ बी पी पाटील, ए टी पाडे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बी एम भरगंडे, मुख्याध्यापक एस आर पवार व सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.
------------------------------------------ 
****************************
*aj24taas news*
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 



------------------------------------------ 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा