Breaking

शुक्रवार, १७ जुलै, २०२०

*आज चार गावात पांच रुग्ण आढळल्याने माढा तालुका पन्नाशीच्या उंबरठ्यावर...*


*आज चार गावात पांच रुग्ण आढळल्याने माढा तालुका पन्नाशीच्या उंबरठ्यावर...*
   
------------------------------------------ 
 *प्रलंबित सर्वाधिक शंभरएक स्वॅब तपासणीचे अहवालांनी उडवलीय सर्वाची झोप*
  


*कुर्डुवाडी अरुण कोरे(पत्रकार) यांजकडून
------------------------------------------ 
   माढा तालुक्यातील कोरोनो पाॅझिटीव्ह रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे सर्वांचीच झोप उडाली असून आज शुक्रवारी नव्याने पाच रुग्णांची भर पडली आहे.
    आज चिंचगाव,रिधोरे,सापटणे (टें) प्रत्येकी एक व भोसरे येथील दोन असे पाच पाॅझीटीव्ह रुग्णांची भर पडल्याने माढा तालुका पन्नाशीच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे.
बघता बघता माढा तालुक्यातील वरवडे,लऊळ,मोडनिंब,दारफळ,चिंचगाव,रिधोरे, रोपळे,भोसरे,आकुंभे, अकोले बु!!, सापटणे,कुर्डुवाडी,चिंकहिल अशा पंधरा गावात ४१ पाॅझीटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत.

 तालुक्यात गुरुवारी सर्वाधिक ९५ संपर्कातील लोकांचे स्वॅब तपासणीसाठी सोलापूरला पाठविण्यात आले असून त्यांचें रिपोर्ट प्रलंबित असल्याने सर्वांचीच झोप उडाली आहे.
   कुर्डुवाडी शहरातील ३५ जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले असून रिपोर्ट प्रलंबित आहेत.
   माढा तालुक्यात गेल्या तीन महिन्यांपासून शहरी भागातून लपून छपून येणाऱ्यांचे प्रमाण वाढले होते. त्यांनी नियमांचे पालन कटाक्षाने केले नाही.
  हे सर्वजण कोरोनोरुपी भूसुरुंगच पेरत असल्याने त्याचा स्फोट अटळच होता.स्फोटकांनी  कुर्डुवाडीसह तेरा गावे तर पादाक्रांत केली आहेतच.
   प्रलंबित सर्वाधिक शंभरएक स्वॅब तपासणीचे काय रिपोर्ट येणार याकडे तालुका वाशियां बरोबरच आरोग्य, पोलिस, प्रशासनाचे लक्ष वेधले असून आजपासूनच यंत्रणा सतर्क होऊन कामाला लागली आहे.
 दरम्यान समाधानाची बाब म्हणजे शुक्रवारी सहा जणांना कोविड केअर सेंटर मधून करोनोमुक्त झाल्यानें डिस्चार्ज देण्यात आल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.पलंगे यांनी सांगितले.
         कुर्डुवाडी, टेंभुर्णी, मोडनिंब ही मोठी गावेही रडारवर आल्याने सर्वत्र चिंता व्यक्त केली जात आहे
 नागरिकांनी अतिदक्षता घेऊन बाहेर पडण्याचे टाळावे व नियमांचे पालन करावे असे पोलिस, आरोग्य, प्रशासनाने आवाहन केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा