Breaking

बुधवार, ८ जुलै, २०२०

टेंभुर्णी जवळील अकोले बु.येथील तीन जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह*


माढा तालुक्यातील अकोले बुद्रुक येथील युवक त्याची पत्नी व वडील अशा तीन जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ उडाली असून या रुग्णांचे टेंभुर्णी कनेक्शन असल्याने टेंभुणीत भीतीयुक्त वातावरण पसरले आहे



टेंभुर्णी [प्रतिनिधी ]
माढा तालुक्यातील अकोले बुद्रुक येथील युवक त्याची पत्नी व वडील अशा तीन जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ उडाली असून या रुग्णांचे टेंभुर्णी कनेक्शन असल्याने टेंभुणीत भीतीयुक्त वातावरण पसरले आहे.


अकोले बु। येथील एक तीस वर्षे वयाचा तरुण टेंभुर्णी येथे खाजगी हॉस्पिटलमध्ये एक ते तीन जुलै दरम्यान कणकणी आल्याने उपचार घेत होता.यानंतर त्यास अकलूज येथे हलविण्यात आले होते.तेथे त्याची,त्याच्या पत्नीचा व वडिलांचा खाजगी लॅबमध्ये कोरोनाचा स्वब घेण्यात आला होता.तो तिघांचाही अहवाल पॉझिटिव्ह आला.नंतर त्याच दिवशी त्यास एकट्यास पुणे येथे हृदयनाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले.या तिघांच्या चाचण्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने प्रशासन हादरून गेले आहे.या घटनेने आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे.प्रशासनाने तो टेंभुणीत उपचार घेत असलेले खाजगी हॉस्पिटल बुधवारी सकाळीच सील केले असून हॉस्पिटल मधील डॉक्टर्स व सर्व कर्मचारी अशा १८ जणांना कोरोनटाईन करण्यात आले आहे.


यानंतर आरोग्य यंत्रणा या रुग्णांचे हाय रिस्क व लो रिस्क कॉन्टॅक्ट तपासत आहेत.तसेच टेंभुर्णीतील खाजगी हॉस्पिटल मध्ये गेल्या आठ दिवसात आलेल्या रुग्णांची माहिती गोळा करण्यात येत आहे.तसेच त्या रुग्णांचे गाव परिते प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कक्षेत येत असल्याने परिते प्राथमिक केंद्राचे पथक अकोले बु.गावात दाखल झाले असून त्यांनी तेथे दक्षता म्हणून घरा जवळचा परिसर सील केला आहे.सदर रुग्ण वस्तीवर राहत असून एक किमी अंतर कोणी राहत नाही.तहसीलदार,ता.वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रशांत पलंगे यांनी याठिकाणी भेट दिली आहे.

दरम्यान नागरिकांनी घाबरून न जाता प्रशासनाने केलेल्या सूचनांचे पालन करावे व घराबाहेर पडू नये,घरात सुरक्षित राहावे असे आवाहन टेंभुर्णी प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ.अमोल माने व डॉ.विक्रांत रेळेकर यांनी केले आहे.
.