एका दिवसात २३ हजार दंड वसूल : -
एका दिवसात १३९ लोकांवर दंडात्मक कारवाई करून पोलिसांनी २३ हजार २०० रु.दंड वसूल केला.यामध्ये मास्क न लावलेल्या ५२ व्यक्तींकडून ५२०० रु.दंड तर इतर ८७ वेगवेगळ्या केसेसमध्ये १८ हजार रु.असा मिळून एकूण २३ हजार २०० रु.दंड वसूल करण्यात आला.
टेंभुर्णी [प्रतिनिधी]
टेंभुर्णी शहरात कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा लॉकडाउनचे पालन न करणाऱ्यांच्या व नाहक फिरणाऱ्यांच्या विरोधात पोलीस प्रशासनाने कडक मोहीम उघडली असून आज सोमवारी सकाळी सुमारे १४० जणांवर दंडात्मक कारवाई करून २३ हजार दंड वसूल केल्याची माहिती पोलीस निरिक्षक राजकुमार केंद्रे यांनी पत्रकार परीषद मध्ये दिली
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने पुन्हा एकदा आपत्ती व्यवस्थान कायदा व संचारबंदी नियम लागू केले असून कडक अंमलबजावणी करण्यात येत आहे.या कारवाई संदर्भात पत्रकार परिषदेत बोलताना टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे पिलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे यांनी सांगितले की,नागरिकांच्या सोयीसाठी सकाळी ९ ते सायंकाळी ५ वा.या वेळेत संचारबंदी शिथिल करण्यात आली आहे.
अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकानेसकाळी ९ वा.पूर्वी व सायंकाळी ५ वा.नंतर सुरु ठेवण्यास प्रतिबंध करण्यात आला असून शहरात फिरताना मास्क न लावणे,
वेळेपूर्वी दुकाने उघडणे,दुचाकीवरील डबलसीट प्रवास करणे-५०० रु.दंड,तीनजण प्रवास करणे ७५० रु.दंड,तीन चाकी वाहनात तिनपेक्षा जास्त व्यक्ती ५०० रु.दंड,चार चाकी वाहनात तिघांपेक्षा जास्त व्यक्ती प्रवास करीत असल्यास प्रति व्यक्ती ५०० रु.दंड,निर्धारित वेळे नंतर दुकाने चालू असल्यास तसेच साठ वर्षा पेक्षा जास्त वय असलेला मालक किंवा नौकर दुकानात असल्यास दुकानाचा परवाना निलंबित करून दुकान सील करणे.दुकानात पाचपेक्षा जास्त लोकांनी गर्दी करणे,सार्वजनिक ठिकाणी थुंकणे,फिजिकल डिस्टन्सिंग न पाळणे या नियमांचे पालन न केल्यास कठोर कारवाईस सामोरे जावे लागेल.प्रसंगी गरज पडल्यास पोलीस दंडुक्याचा वापर ही करण्यास मागे पुढे पाहणार नाहीत असे सांगून मास्क वापरा व जीवन सुरक्षित करा असा संदेश पोनि राजकुमार केंद्रे यांनी जनतेस दिला आहे.