टेंभुर्णी [प्रतिनिधी ] जगामध्ये धुमाकुळ घातलेला कोरोना आपल्या देशात झपाट्याने वाढत चालला असुन आता मोठ्या शहरा बरोबर ग्रामीण भागांत ही शिरकाव करण्यास सुरुवात झाली आहे सोलापुर शहराबरोबर ग्रामीण भागात झपाट्याने वाढत असतांना आता माढा तालुक्यात शिरकाव केला आहे याचाच फटका कोंढार भागामध्ये बसु नये म्हणुन सामाजिक बांधिलकी जपत वडोलीचे उपसरपंच तानाजी गाडे यांनी माढा तालुक्यातील वडोली येथे नेहरू युवा समिती माढा तालुका यांच्या वतिने व टेंभुर्णी शहरातील अश्विनी हॉस्पिटल यांच्या मार्फत आर्सानिक अल्बम ३० गोळ्यांचे ५०० कुटुंबांना वाटप करण्यांत आले.
या कार्याक्रमाचे आयोजन श्री.तानाजी (भैय्या) गाडे उपसरपंच वडोली यांनी केले यावेळी अश्विनी हॉस्पिटलचे डॉ.मामासाहेब पाडुळे यांनी उपस्थित ग्रामस्थांना या गोळ्या कशा खायच्या याबाबत बाबत मार्गदर्शन केले. यावेळी डॉ.टेळे, तानाजी सलगर अध्यक्ष नेहरू युवा मंडळ टाकळी, पत्रकार अनिल जगताप , नारायण सोनवणे ग्रामसेवक, आप्पासाहेब बंडगर सरपंच, धनाजी काळे पोलीस पाटील,गणेश खडतरे, सुभाष लोकरे,बिटू सूरवसे,नामदेव काळे, मचिंद्र मोरे, भैरू पिसाळ, बाळू बागाव, सुरेश मोरे, सागर सुरवसे, सचिन माने, सुखदेव मोरे,बबन बागाव, दादासो भाग्यवंत,समीर घुले, पै.अमोल बागाव, कुणाल सुरवसे, संजय कांबळे, विकी मोरे,धनाजी बागाव आदी ग्रामस्थ उपस्थित होते या कार्यक्रमाचे आभार वडोलीचे ग्रामसेवक नारायण सोनवने यांनी मानले.