Breaking

बुधवार, २२ जुलै, २०२०

*इनरव्हील च्या पदाधिकाऱ्यांनी कौतुकास्पद कार्य करावे -पो .नि .राजकुमार केंद्रे यांचे आवाहन*

*इनरव्हील च्या पदाधिकाऱ्यांनी कौतुकास्पद कार्य करावे -पो .नि .राजकुमार केंद्रे यांचे आवाहन*





*aj24taas news*
*****************
टेंभुर्णी :[ प्रतिनिधी ] दि.22       -इनरव्हील क्लबच्या पदाधिकाऱ्यांनी व सर्व सदस्यांनी आतापर्यंत लोकोपयोगी कार्य करून लोकांची चांगली सेवा केली आहे.यापुढेही इनरव्हील क्लबच्या नूतन पदाधिकाऱ्यांनी यापुढे आणखी कौतुकास्पद कार्य करावे असे आवाहन पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे यांनी व्यक्त केली.
टेंभुर्णी रोटरी सांस्कृतिक भवन येथे टेंभुर्णी इनरव्हील क्बलच्या नूतन अध्यक्षा स्मिता गांधी व सचिवपदी तनुजा शहा यांचा पदग्रहण समारंभ नुकताच संपन्न झाला.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पोनि राजकुमार केंद्रे हे बोलत होते. 

यावेळी अड संतोष कानडे,बेंबळे येथील नैसर्गिक शेती व पंचगव्य तज्ञ समाधान पाटील,रोटरीचे अध्यक्ष शब्बीर जहागीरदार,सचिव उमेश रावळ,कॅन्सर फौंडेशनचे योगेश भणगे हे प्रमुख मान्यवर उपस्थित होते.






यावेळी नुतन अध्यक्ष म्हणून स्मिता अतुल गांधी,सचिव तनूजा मनोज शहा,उपाध्यक्ष स्वाती गांधी,मावळत्या अध्यक्षा डॉ.रजिता रैना, ट्रेझरर मंगल कल्याणी,अंकिता यंकेश्वरा,अर्चना लोकरे,रेणुका भणगे, संगिता सपाटे या पदाधिकाऱ्यांचा पद्ग्रहण समारंभ संपन्न झाला.
कार्यक्रमाची सुरवात श्रावणी ताबे हिने गणेश वंदनेवर नृत्य सादर करून केली. इनव्हील क्लब मार्फत वृद्ध,गरजु महिला, मूली तसेच तरुण मुलांसाठी कला,कौशल्य विकसित करणारी कार्यशाळा घेऊन दर्जेदार कार्य करण्याची ग्वाही नूतन अध्यक्षा स्मिता गांधी यांनी दिली.
अड.संतोष कानडे यांनी अल्पवयीन मुली,मुले,महिला जाचहाट,महिलांवरील अत्याचार याविषयी उपयुक्त मार्गदर्शन केले.तर नैसर्गीक शेती व पंचगव्य तज्ञ    पाटील यांनी विषमुक्त अन्न धन्य व भाजी पाला याविषयी माहिती दिली.
प्रस्ताविक रजिता रैना यांनी केले,त्यात त्यांनी गतवर्षी केलेल्या कामाचा आढावा घेतला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वेदांती कुलकर्णी हिने तर आभार स्वाती गांधी यांनी मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा