*खडकवासला मतदार संघात 700 बेडचे कोव्हीड केअर - गरज भासल्यास 300 बेड वाढवणार आ.तापकीर*
------------------------------------------
*aj24taas news*
पुणे प्रतिनिधी -श्रीकांत कापरे
*************************
पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सर्वात मोठे ७०० बेडचे कोव्हीड केअर सेंटर आमदार भिमराव तापकीर यांच्या प्रयत्नांतून सुरू...गरज भासल्यास आणखी ३०० बेड वाढवणार असल्याचे आ.तापकीर यांनी aj24taas च्या प्रतिनिधीला बोलताना सांगीतले. ते पुढे बोलतांना म्हणाले की अँटीजेन रॅपिड टेस्ट देखील लवकरच सुरू करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे सांगीतले
पुणे शहर व भोवतालच्या ग्रामीण भागात मागील महीना भरात अचानक कोरोना रूग्णांची संख्या वाढली. पाॅझिटिव्ह रूग्ण, तसेच त्यांच्या संपर्कातील रूग्णांना रूग्णालयात जागा नसल्याने रूग्णांना वेळेवर सेवा मिळत नव्हती. पंधरा दिवसांपूर्वी यासंदर्भात जिल्हा प्रशासन, हवेली तालुका प्रशासन व संबंधीत अधिकारी, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांच्याबरोबर सविस्तर चर्चा करून आग्रही मागणी *खडकवासला विधानसभा मतदार संघाचे आमदार मा. भिमराव (आण्णा ) तापकीर* यांनी केली होती. त्यानुसार जिल्हा प्रशासन व हवेली तालुका प्रशासनाने तातडीने पावले उचलत *पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सर्वात मोठे ७०० बेडचे कोव्हीड केअर सेंटर* हे *खडकवासला मतदार संघातील नर्हे गाव* येथील *सिंहगड टेक्निकल एज्युकेशन संस्थेच्या वसतिगृहात* सुरू करण्यात आले आहे. गरच भासल्यास याठिकाणी *आणखी ३०० बेडची व्यवस्था* देखील केली जाऊ शकते. येथे उपचार सुरू असणार्या रूग्णांना श्वासोच्छ्वास घेण्यास त्रास होत असल्यास रूग्णालयात दाखल करण्याच्या वेळेपुरता तातडीची ऑक्सिजन व्यवस्था देखील आहे.
हवेली तालुक्यातील पश्चिम भागातील सर्व गावातील रूग्णांची व्यवस्था येथे होणार आहे.आज या कोव्हीड केअर सेंटरला *आमदार मा. भिमराव (आण्णा) तापकीर* यांनी भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत प्रांताधिकारी सचिन बारवकर, गटविकास अधिकारी प्रशांत शिर्के, भाजपा खडकवासला अध्यक्ष सचिन मोरे, नर्हे गावच्या सरपंच मीनाक्षी वनशीव, उपसरपंच सागर भुमकर, वैद्यकीय अधिकारी वंदना गवळी, बाळासाहेब आहेर, मंडलाधिकारी रोहिदास जाधव, ग्रामसेवक बाळासाहेब गावडे, तलाठी योगिता गायकवाड, नितीन वाघ, ग्रामपंचायत सदस्य सुशांत कुटे, ग्रामस्थ व पदाधिकारी प्रतिनिधी सहीत उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा