15 आॕगस्ष्ट ला स्वातंत्र्यसैनिक,तंटामुक्ती समिती अध्यक्षांना ध्वजारोहणाचा मान...
शासनाच्या ग्रामविकास विभागाचे परिपत्रक...
नांदेड प्रतिनिधी
बालाजी सिरसाट
कोरोनामुळे मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत अशा ग्रामपंचायतीवर प्रशासनाची नियुक्ती करण्यात आली आहे.जर प्रशासनाकडे अधिकचे काम असल्यास 15 ऑगस्ट रोजी ध्वजारोहन करण्याचा मान स्वातंत्र्यसैनिक व तंटामुक्ती अध्यक्षांना दिला आहे.
सध्या राज्यासह देशभरात कोरोना महामारीने थैमान घातले असल्याने निवडणूक आयोगाने ग्रामपंचायतीच्या निवडणुका डिसेंबर अखेरपर्यंत पुढे ढकलल्या आहेत.मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीवर स्वतंत्र दिनाच्या ध्वजारोहनासाठी नियुक्त प्रशासकास ज्यादा कामे असतील तर त्या ठिकाणी ध्वजारोहण करण्यासाठी गावातील स्वातंत्र्यसैनिक, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष यांना संधी देण्यात आली असल्याचे परिपत्रक ग्रामविकास विभागाने 10 ऑगस्ट रोजी जारी केले आहे.
15 ऑगस्ट हा दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जातो. आगामी पंधरा तारखेला स्वतंत्र दिवस साजरा केला जाणार आहे. ध्वज संहितेनुसार दरवर्षी ग्रामपंचायतीवर गावोगावी सरपंचांच्या हस्ते ध्वजारोहण केले जाते.परंतु यावर्षी देशभरात कोरोना महामारीने थैमान घातले आहे.त्यामुळे मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका निवडणूक आयोगाने डिसेंबर अखेरपर्यंत पुढे ढकलल्या आहेत. लोहा तालुक्यात 84 ग्रामपंचायतीसह राज्यभरात 14 हजार 234 ग्रामपंचायतींच्या निवडणुका डिसेंबर पर्यंत घेणे शक्य नसल्याचे निवडणूक आयोगाने जाहीर केली आहे.
त्यामुळे मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीत स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण करण्यासाठी प्रशासनाच्या ग्रामविकास विभागाने नवीन आदेश जारी केले आहेत.एकापेक्षा जास्त गावाचा कारभार असणाऱ्या प्रशासकांनी एका गावाची निवड करून त्या ठिकाणी ध्वजारोहण करावे.उर्वरित गावात स्वतंत्रसैनिक यांना प्रथम संधी द्यावी.या गावात स्वातंत्र्यसैनिक नसतील तर तंटामुक्ती समिती अध्यक्ष यांना दोन करण्यास संधी द्यावी.तंटामुक्ती अध्यक्ष पद रिक्त असेल तर त्या गावातील ग्रामसेवकाने ध्वजारोहण करावे. तसेच या तिन्ही पैकी कोणतेही शक्य नसल्यास गटविकास अधिकाऱ्यांनी एखाद्या शासकीय अधिकाऱ्यांची ध्वजारोहण करण्यासाठी नियुक्ती करावी,असे आदेश ग्रामविकास विभागाने दिले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा