.
*राष्ट्रीय महामार्ग 965 रस्तालगत असणारे महापुरुषांचे पुतळे हटवण्यास संभाजी ब्रिगेडचा विरोध*
------------------------------------------
माळशिरस /प्रतिनिधी
माळशिरस दि.
सध्या महाराष्ट्रात सर्वत्र महामार्गांची कामे मोठ्या प्रमाणात सुरु असून सोलापूर जिल्ह्यात संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाची कामे सुरू झाली असून या जुन्या रस्तालगत महापुरुषांचे पुतळे आहेत, हे महापुरुषांचे पुतळे न हटवता पर्यायी मार्ग काढून रस्त्याचे काम करावे असे निवेदन माळशिरस तालुका संभाजी ब्रिगेड यांचे वतीने सोलापूर येथील प्रकल्प संचालक भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण यांना देण्यात आले आहे
सदर महापुरुषांचे पुतळे हटवल्यास संभाजी ब्रिगेड तिव्र आंदोलन करेल असा इशारा संभाजी ब्रिगेड माळशिरस तालुका अध्यक्ष शिवश्री हनुमंतराव साळुंखे पाटिल यांनी सांगितले
------------------------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा