.
मराठा सेवा संघ प्रणित जिजाऊ ब्रिगेड सोलापूर जिल्हा अध्यक्षपदी सुरजा बोबडे यांची निवड
टेंभुर्णी /प्रतिनिधी
जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्ष माधुरीताई भदाणे महासचिव सारिका अंबुरे व प्रदेश कार्याध्यक्ष नंदाताई शिंदे यांनी राज्यातील सर्व जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष ची निवड ही ऑनलाइन मुलाखती घेऊन केली ज्यामध्ये सोलापूर जिल्हा पंढरपूर विभाग जिजाऊ ब्रिगेड अध्यक्षपदी सुरजा योगेश बोबडे यांची निवड करण्यात आली.
आदरणीय खेडेकर साहेब यांच्या विचाराने प्रेरित होऊन अनेक बहुजन महामानवाचा विचार सोबतीला घेऊन महिलांचे मानसिक शारीरिक आर्थिक उन्नतीचे ध्येय उराशी बाळगून जिजाऊ ब्रिगेड ही संघटना काम करते. यापूर्वी सुरजा बोबडे यांनी जिजाऊ ब्रिगेडच्या कार्याध्यक्ष म्हणून टेंभुर्णी परिसर व पंढरपूर विभागांमध्ये जिजाऊ ब्रिगेड संघटना वाढीसाठी तसेच महिलांसाठी अनेक उपक्रम राबविले बचत गटाच्या माध्यमातून लघु उद्योग व्यवसायास चालना दिली, महिला सक्षमीकरण आणि सबलीकरण यासाठी जिजाऊ ब्रिगेड च्या माध्यमातून जास्तीत जास्त प्रयत्न करण्यात आले ज्यामध्ये सर्वात उल्लेखनीय कार्य म्हणजे सध्याच्या काळात मुलींवर होणारे अत्याचार संपुष्टात यावे या उद्देशाने हर एक जिजाऊची लेक वाघीण झाली पाहिजे हे ब्रीद वाक्य घेऊन अनेक शाळांतील प्रत्येक मुलीला मोफत कराटे प्रशिक्षण देण्यात आले या सर्व कार्याची दखल घेऊन प्रदेश संघटनेकडून त्यांची जिल्हाध्यक्ष म्हणून नुकतीच निवड करण्यात आली.
उत्तमराव माने शेंडगे पश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष मराठा सेवा संघ टी आर पाटील सोलापूर जिल्हाध्यक्ष मराठा सेवा संघ नितीन खटके संभाजी ब्रिगेड कार्याध्यक्ष पुणे विभाग तसेच प्रियाताई नागणे माजी जिल्हाध्यक्ष जिजाऊ ब्रिगेड पंढरपूर विभाग यांच्या हस्ते नूतन जिल्हाध्यक्ष सुरजा बोबडे यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.
यावेळी श्री महाडिक सर सोलापूर जिल्हाध्यक्ष जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषद विलास कोठावळे शहराध्यक्ष टेंभुर्णी संभाजी ब्रिगेड हरिभाऊ सटाले ग्रामपंचायत सदस्य सतीश चांदगुडे प्रसिद्धीप्रमुख माढा तालुका संभाजी ब्रिगेड नागनाथ शिंदे सर भारत सांगडे धोंड भाऊसाहेब जिजाऊ ब्रिगेडच्या मार्गदर्शिका अक्काताई माने तसेच जिजाऊ ब्रिगेडच्या सदस्या रत्नमाला शिंदे सचिव पंढरपूर विभाग शीला सटाले शहराध्यक्ष टेंभुर्णी पल्लवी गायकवाड अर्चना पांडे कर रोहिणी कोठावळे प्रियंका खटके सुनिता घाडगे वंदना सांगडे अनिता लोंढे व पल्लवी जाधव उपस्थित होते.
यावेळी सुरज बोबडे यांनी पंढरपूर विभागात ग्राम शाखा उघडून तळागाळातील बहुजन महिलांची वैचारिक आर्थिक उन्नती करण्याच्या उद्देशाने भविष्यामध्ये काम करणार असल्याचे सांगितले. तसेच विभागीय अध्यक्ष उत्तमराव माने शेंडगे यांनी आपल्या मनोगतामध्ये पंढरपूर विभाग जिजाऊ ब्रिगेड चे काम भविष्य काळामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वोत्कृष्ट पद्धतीचे असेल अशाप्रकारे शुभेच्छा दिल्या तसेच मराठा सेवा संघ सोलापूर जिल्हाध्यक्ष टी आर पाटील यांनी जिजाऊ ब्रिगेड ला मराठा सेवा संघाच्या वतीने सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले तसेच महिलांचे संघटन करण्यासाठी सेवा संघाची सदैव साथ राहील असे सांगितले.
यावेळी श्री महाडिक सर तसेच नागनाथ शिंदे सर यांनीही मनोगत व्यक्त करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा