.
हळद शिजविण्याच्या सोलार एनर्जीसंदर्भात 'एसजीजीएस' शी करार- नरेंद चव्हाण
नांदेड प्रतिनिधी
बालाजी सिरसाट
नांदेड दि.23
नांदेड,हिंगोली,परभणी जिल्ह्यातील हळद उत्पादक शेतकऱ्यांसाठी नंदिग्राम अग्रो व एसजीजीएस कॉलेज यांच्यात सोलार एनर्जी संदर्भात नुकताच करार करण्यात आला.
नांदेड हिंगोली परभणी जिल्ह्यातील हळद पिकाची लागवड आठ ते दहा लाख एकर मध्ये होते. हळदीचे पिक आल्यानंतर हळद शिजवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर कुकरचा वापर करण्यात येतो.शेतकरी यासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षाची कत्तल करतात.परंतु आता यापुढे हळद शिजवण्यासाठी सोलार चा वापर करण्यात येणार असून त्यामुळे लाखो शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे.वातावरणाला ही याचा फायदा होणार असून हळद शिजवत असताना जो कार्बन तयार होतो तो वातावरणासाठी घातक असतो.
यापुढे नंदिग्रामशी जुडलेल्या शेतकऱ्यांना याचा फायदा होणार असल्याचे शेतकरी नेते नरेंद्र चव्हाण यांनी सांगितले...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा