Breaking

रविवार, २३ ऑगस्ट, २०२०

*भारतात ७३ दिवसांत येणार करोनाची लस, सरकार करणार मोफत लसीकरण?*सर्वसामान्याला दिलासा मिळणार* *

*

*भारतात ७३ दिवसांत येणार करोनाची लस, सरकार करणार मोफत लसीकरण?*सर्वसामान्याला दिलासा मिळणार*
 *केंद्र सरकार या लसीचे मोफत लसीकरण करणार आहे.*


*पुणे/प्रतिनिधी*

पुणे दि.  करोनाच्या संकटात भारतीयांसाठी एक खूशखबर आहे. कारण भारतीयांची करोना विषाणूवरील लसीची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. येत्या ७३ दिवसांमध्ये ‘कोविशिल्ड’ नावाची कोविड-१९ आजारावरील भारताची पहिली विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. या लसीवर काम करणाऱ्या सीरम इन्स्टिट्यूटने याबाबत माहिती दिली आहे. विशेष म्हणजे केंद्र सरकार याचे मोफत लसीकरण करणार आहे.

या लसीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सिरम इन्स्टिट्यूटकडून सुरु आहे. ही लस ऑक्सफर्ड विद्यापीठाने तयार केली असून त्याची भारतातच निर्मिती केली जाणार आहे. बिझनेस टुडेने सिरम इन्स्टिट्यूटच्या हवाल्याने याबाबत वृत्त दिले आहे.

‘सिरम’चे वरिष्ठ अधिकारी म्हणाले, “सरकारने ‘सिरम’ला लसीचा ‘विशेष उत्पादन प्राधान्य परवाना’ दिला आहे. तसेच चाचण्यांची प्रोटोकॉल प्रक्रिया ५८ दिवसांत पूर्ण करण्यासाठी वेगाने काम करण्याचे सूचित केले होते. याद्वारे पहिला डोस हा शनिवारी (२२ ऑगस्ट) त्यानंतर दुसरा डोस हा २९ दिवसांनी तयार होईल. त्यानंतर पुढच्या १५ दिवसांत अंतिम चाचणी अहवाल सादर केला जाईल. त्यानंतर आम्ही कोविशिल्ड लस बाजारात आणण्याच्या विचारात आहोत.”

या लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला भारतातील २० केंद्रांवर शनिवारपासून सुरुवात झाली. यामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्रात पुणे आणि मुंबईत तर गुजरातमधील अहमदाबाद येथे याची चाचणी होत आहे. या टप्प्यात १,६०० लोकांवर याची चाचणी होणार आहे.

बिझनेस टुडेच्या वृत्तानुसार, ही लस सिरम इन्स्टिट्यूटच्या मालकीची असून कंपनीने ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या अॅस्ट्रा झेनिका लॅबशी याबाबत सर्वात आधी करार केला आहे. या करारांतर्गत भारतासाठी या लसीचे हक्क आणि रॉयल्टी विकत घेण्यात येणार आहे. भारतासह जगातील ९२ देशांमध्ये या लसीची विक्री केली जाणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा