.
संभाजी ब्रिगेडच्या वतीने शेतकऱ्याच्या मुलीचा सन्मान...
नांदेड प्रतिनिधी
बालाजी सिरसाट
कु.निकिता प्रभाकर पतंगे कोठारी ता.किनवट येथील मराठा समाजातील शेतकऱ्याच्या मुलीने दहावी बोर्डाच्या परीक्षेत 92.40 गुण घेऊन घवघवीत यश संपादन केल्या बद्दल आज संभाजी ब्रिगेडच्या वतीने कोठारी येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात कु.निकिता प्रभाकर पतंगे हिचा शाल श्रीफळ व जिजाऊ चरित्र देऊन सत्कार करण्यात आला...
यावेळी मराठा सेवा संघाच्या चळवळीतील जेष्ठ मार्गदर्शक शिवश्री.जनार्धन काकडे सर छत्रपती क्रांती सेनेचे जिल्हाध्यक्ष संतोष अडकीने संभाजी ब्रिगेडचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख बालाजी पाटील सिरसाट संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील कदम छत्रपती क्रांती सेनेचे तालुकाध्यक्ष शिवा पाटील पवार गजू पाटील जाधव संभाजी ब्रिगेडचे शहर उपाध्यक्ष आकाश पाटील इंगोले खंडू काकडे सुधाकर काकडे प्रभाकर पतंगे शंकर पतंगे सचिन पतंगे यांच्या सह ग्रामस्थ उपस्थिती होते...
विशेषतः निकिताचे वडील हे शेतकरी शेतमजूर असून आपल्या मुलीला ते फार कष्टाने मेहनतीने शोकवितात.आपल्या आई-वडिलांच्या परिस्थितीचा सामना करत निकिताने एका खेडेगावात राहून सुद्धा खूप मेहनतीने अभ्यास करून दहावीच्या परीक्षेत 92.40 गुण घेऊन घवघवीत यश संपादन केले आहे.सर्व स्थरातून तीचे कॊतुक होत आहे...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा