Breaking

बुधवार, १९ ऑगस्ट, २०२०

राजूबापूंचा म्रुत्यु मनाला चटका लाउन गेला.... आ.बबनदादा शिंदे

राजूबापूंचा म्रुत्यु मनाला चटका लाउन गेला....
                                           आ.शिंदे
            बेंबळे। प्रतिनीधी।                  

              सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष,गुरसाळे येथील विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक व पंढरपूर तालुक्यातील भोसे गावचे धडाडीचे एक मनमिळावू  नेतृत्व राजू बापू पाटील यांचे 13 ऑगस्ट रोजी निधन झाले. त्यांच्या निधनाने पंढरपूर तालुक्याची मोठी हानी झालेली असून राजू बापू सारख्या संयमी, शांत व गोरगरिबांना मदतीचा तसेच सहकार्याचा हाथ सातत्याने  देणारा नेता पुन्हा होणे नाही,..... अशा शब्दात  माढा विधानसभा मतदार संघाचे आमदार बबनदादा शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. 13 आँगस्ट रोजी भोसे येथील सर्वमान्य नेतृत्व ,व जिल्हा परिषदेचे माजी कृषी व पशुसंवर्धन सभापती राजू बापू पाटील यांचे कोरोनाव्हायरस मुळे निधन झाले. दुर्दैवाची बाब म्हणजे राजू बापूंचे मोठे चुलते आनंदरावदादा पाटील  व धाकटे बंधू महेश पाटील या दोघांचेही कोरोनामुळेच पंधरा दिवसात निधन झाले .अवघ्या पंधरा दिवसात पाटील कुटुंबातील कर्तबगार तीन व्यक्तींचे निधन सर्वत्र  मनाला चटका लावून गेले  व मोठी हळहळ वाटली.
        राजूबापू  पाटील यांनी नुकताच एक साखर कारखाना सुरू केला आहे. मी स्वतः राजू बापू बरोबर , तीन महिन्यापूर्वी कारखान्याच्या आर्थिक अडचणी संदर्भात उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांना भेटलो होतो व अजितदादांनीही  समस्या निश्चितपणे सोडवली जाईल असे सांगितले होते. राजू बापू हे नेहमी गोरगरीब व अडचणीतील व्यक्तींना मदतीचा हात देत असत. त्यांच्या निधनामुळे पाटील कुटुंबीयांवर कोसळलेल्या दुःखात आमचा शिंदे परिवार अंतकरणापासून सामील आहे. राजू बापूंचे चिरंजीव व भोसे गावचे सरपंच गणेश पाटील यांना आमचे कडून सदैव सहकार्य राहील अशा  भावना आमदार शिंदे यांनी व्यक्त केल्या आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा