डाॕ बाबासाहेब आंबेडकर पुतळा *विटंबना प्रकरनी आरोपीवर कठोर कारवाई साठी बहूजन वंचित चे निवेदन*
टेंभुर्णी [प्रतिनिधी ] नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील माळेगाव येथे डाॕ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना प्रकरनी आरोपीवर कठोर कारवाई करण्याच्या मागणी साठी बहुजन वंचित आघाडी शहर व माढातालुक्याच्या वतिने टेंभुर्णी पोलिसस्टेशनचे पो.नि राजकुमार केंद्रे यांचा कडे निवेदन देण्यात आले
तसेच वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष आद. बाळासाहेब आंबेडकर ,यांच्या आदेशानुसार वंचित बहुजन आघाडी टेंभुर्णी शहर व माढा तालुक्याच्या वतीने ओ. बी. सी. समाजाचे मंडल कमिशन नुसार दिलेल्या 27 % आरक्षणाची तरतूद कायम ठेवण्या बाबत ही या वेळी निवेदना द्वारे शासनाकडे मागणी- करण्यात आली .
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे मा. विशाल नवगिरे, प्रवीण वाघमारे, राजू लोंढे, संतोष बनसोडे, शरद बनसोडे, विशाल मिसाळ, जुगल खरात,राम नवगिरे, सुशील वाघमारे, दयानंद वाघमारे, श्रीकांत गायकवाड पदाधीकारी कार्यकर्ते उपस्थित होते
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा