Breaking

शनिवार, १५ ऑगस्ट, २०२०

*टेंभुर्णी शहर बंद पुकारलेला मागे घेतला- सरपंच प्रमोद कुठे*

*टेंभुर्णी शहर बंद पुकारलेला  मागे घेतला- सरपंच प्रमोद कुठे*
------------------------------------------ 
 टेंभुर्णी[ प्रतिनिधी] सध्या सोलापूर शहरा बरोबर ग्रामीण भागातही ही कोरोना  सारख्या महाभयंकर आजाराने ग्रामीण भागात धुमाकूळ घातला असून त्याचबरोबर टेंभुर्णी शहरातील कोरोनाची चार  जणांना लागण झाल्याने टेंभुर्णी शहरात घबराट पसरली असून पुन्हा कोरोना रुग्ण वाढू नये या साठी  टेंभुर्णी ग्रामपंचायत व टेंभुर्णी पोलीस स्टेशन ,प्रशासन  यांच्या संयुक्त विचाराने कोरोनाचा   प्रदू भाव रोखण्यासाठी टेंभुर्णी शहर रविवार दिनांक 16 सोमवार दिनांक 17 मंगळवार दिनांक 18 या कालावधीत टेंभुर्णी शहर अत्यावश्यक वगळता सर्व कडकडीत बंद करण्याचा निर्णय टेंभुर्णी ग्रामपंचायतचे सरपंच प्रमोद कुठे यांनी घेतला असल्याचे सांगितले होते .
परंतु या श्रावण महिन्यामध्ये शेतकऱ्यांचा महत्त्वाचा सण म्हणजे सोलापूर जिल्ह्यामध्ये श्रावणी पोळा हा उत्साह आनंद साजरा केला जातो या श्रावणी पोळ्यानिमित्त टेंभुर्णी शहरातील व्यापाऱ्यांनी या सणानिमित्त हजारो रुपयाचा माल भरला असून जर टेंभुर्णी शहर तीन दिवस बंद राहिली तर हा व्यापाऱ्याचा भरलेला माल एक वर्षभर पडून राहिली व पुन्हा व्यापाऱ्यानर्ची नुसकान  होईल या दृष्टिकोनातून टेंभुर्णी ग्रामपंचायतचे सरपंच प्रमोद कुटे व सर्व ग्रामपंचायत सदस्य यांनी आज पुन्हा दुपारी बैठक घेऊन शेतकऱ्यांच्या अडचणी व व्यापाऱ्यांच्या मालाचा विचार करता हा संप तीन दिवस बंद चा मागे घेतला असल्याचे जाहीर केले असून टेंभुर्णी करानी ठरल्याप्रमाणे सकाळी 9 ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत सर्व दुकाने चालू ठेवावीत असे टेंभुर्णी ग्रामपंचायत ने आव्हान केले आहे.


********* * नांगरे परीवार चव्हाणवाडी (टें ) ता. माढा. ***

*******

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा