,
*मिनाक्षी आमोल जगदाळे (अंधारे) यांना ड्रीम कॅचर्सकडून दिल्ली येथे IIWA पुरस्कार जाहीर*
------------------------------------------
टेंभुर्णी [प्रतिनिधी] :- ड्रीम कॅचर्सने दिल्ली येथे २३ ऑगस्ट २०२० रोजी आयोजित केलेल्या वर्चुअल अॅवॉर्ड इव्हेंट, इंडिया इन्सपिरेशनल वुमेन्स अॅवॉर्ड IIWA 2020 मध्ये मिनाक्षी अमोल जगदाळे (अंधारे) टेंभुर्णी यांना अर्थशास्त्रातील प्रतिभावान व्याख्याते म्हणून IIWA पुरस्काराने गौरविल्याने त्यांचे सर्व स्तरांतून कौतुक होत
मिनाक्षी अमोल जगदाळे(अंधारे) या सध्या आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रामध्ये पीएचडी करीत आहेत. त्यांनी आजपर्यंत शिक्षण क्षेत्रात दहा डिग्र्या मिळविल्या असून अंध, अपंग, विकलांग, परितक्त्या, मुकबधीर, रिमांड होम, कमिशनर ऑफिस फॅमिली काऊंसेलिंग सेंटर, झोपडपट्टी, मुलांची शाळा अशा लोकांसाठी काम केले आहे. त्याचबरोबर १२ राज्यांमधील एनजीओला भेटी देऊन १४ राज्यांमध्ये इंडस्ट्रियल व्हिजिट केल्या आहेत. बिर्ला सुपर सिमेंट सारख्या नामांकित संस्थेमध्ये ट्रेनिंग करून त्याच संस्थेवर एमफिलचे संशोधन केले आहे. तसेच वेगवेगळे नॅशनल, इंटरनॅशनल सेमिनार, वेबिनार, वर्कशॉप अटेंड केले आहेत. युनिव्हर्सिटी, नॅशनल, इंटरनॅशनल मॅग्झीनमधून त्यांचे लेख प्रसिध्द झाले आहेत. त्याचबरोबर त्यांनी भारती विद्यापीठातून समाजकार्यामध्ये मास्टर्स डिग्री घेऊन त्यात देखील एम. फिल केले आहे. सरकारी प्रकल्प सर्व्हे, ग्रामसभा, किशोरी मार्गदर्शन, महिला मेळावे घेतलेले आहेत. तसेच जलस्वराज्य प्रोजेक्टचे काम केले आहे. हे सर्व त्यांनी मानधनाची अपेक्षा न करता समाजसेवा म्हणून केले आहे. त्या विद्यार्थीप्रिय शिक्षिका असून शैक्षणिक मोटिव्हेशनल स्पीकर आहेत. बऱ्याच विषयांवर त्यांनी व्याख्याने दिली आहेत. कला, क्रीडा, हस्ताक्षर, निबंध, गायन, नृत्य शिक्षण यामध्ये त्यांनी जवळपास ८० बक्षिसे मिळवली आहेत. त्या उत्तम सूत्रसंचालक सुध्दा आहेत. मिनाक्षी अमोल जगदाळे(अंधारे) टेंभुर्णी या सर्व गुणसंपन्न व्यक्तिमत्व असल्यामुळे महाराष्ट्रातील १०० महिलांमध्ये दिल्लीतील पुरस्कारासाठी त्यांची शिक्षणक्षेत्र व समाजसेवा पाहून एकमेव निवड केली असून त्यामध्ये त्यांना हा IIWA हा पुरस्कार प्रदान केल्याने त्यांच्यावर सर्व स्तरातून त्यांचे कौतुकाचा वर्षाव होताना दिसत आहे. कला, क्रीडा, साहित्य, लाईफस्टाईल, फॅशन, संशोधन, समाजसेवा, आरोग्यसेवा, शिक्षण, उद्योजकता, अभियांत्रिकी, निरोगीपणा, आतिथ्य आणि इतर बर्याच प्रकारातील उद्योजक, व्यवसाय अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये असामान्य काम करणाऱ्या १०० महिलांना हा अॅवॉर्ड देण्यात येतो. त्यासाठी संपूर्ण देशातून वेगवेगळ्या राज्यातून वेगवेगळ्या क्षेत्रातील महिलांची निवड ही प्रत्येक विषयातील एक्सपर्ट कमिटी मार्फत दिल्लीमधून केली जाते. मागील दहा वर्षांपासून ड्रिम कॅचर्सच्या माध्यमातून हा बक्षीस वितरण सोहळा दिल्लीमध्ये पार पडतो. परंतु यावर्षी कोरोनामुळे हा पुरस्कार सोहळा ४ तास झूम मिटींगच्या माध्यमातून झाला हा अँवॉर्ड घरी पाठवले. या महिला पुरस्कार IIWA 2020 मध्ये प्रमुख पाहुणे म्हणून विविध मान्यवरांनी पुरस्कार सोहळ्यास ऑनलाईन हजेरी लावली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा