*दैनिक लोकमत चे पत्रकार इरफान शेख यांचें हृदयविकाराने झटक्याने निधन*
------------------------------------------
टेंभुर्णी [ प्रतिनिधी ] दि.31 कुर्डूवाडी येथिल र्दैनिक लोकमत चे पत्रकार इरफान शेख [वय - 47 ] रा. कुर्डूवाडी ता.माढा यांचें आज हृदयविकाराने झटक्याने निधन झाले. त्त्यांंच्या पश्चात आई-वडील,पत्नी, व मुलगा-मुलगी, दोन भाऊ असा परिवार आहे. इरफानच्या यांच्या निधनाने माढातालुक्यात पत्रकार संघटनेतून समाजीक,सर्व स्थरातून हळहळ व्यक्त होत आहेत.
माढ्याचे दैनिक लोकमत चे स्व शहाजहान भाई यांच्या निधनानंतर इरफान भाई यांनी समर्थपणे पेलली जवाबदारी अनेक चांगल्या कामास बतमीद्वारे न्याय दिला ,प्रकाशझोतात आणले आणि वाईट आणि अन्याय कारक घटनांवर आसूड ओढले. आज त्यांच्या निधनांने माढातालुक्यातील पत्रकारेतेतील कधीही पोकळी भरुन निघनार नाही असे मत टेंभुर्णी प्रेस क्लब चे अध्यक्ष सोपान ढगे यांनी उदगार काढले टेंभुर्णी प्रेस क्लबच्या वतीने दैनिक लोकमतचे पत्रकार इरफान शेख यांना आज सायंकाळी सात वाजता टेंभुर्णी प्रेस क्लबच्या वतीने भावपुर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी ज्येष्ठ पत्रकार डी एस गायकवाड सर, सदाशिव पवार, संतोष पाटील, विष्णू बिचकुले ,अनिल जगताप, सतीश चांदगुडे, गणेश चौगुले ,सतीश काळे, सचिन होदाडे, अधिक जण उपस्थित होते
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा