Breaking

शनिवार, ५ सप्टेंबर, २०२०

आवर ओन फाउंडेशन तर्फे गरजू विद्यार्थ्याना मोबाईल**ब्रेन ट्यूमरच्या ऑपरेशन साठी 25 हजारांची मद



*आवर ओन फाउंडेशन तर्फे गरजू विद्यार्थ्याना मोबाईल*


*ब्रेन ट्यूमरच्या ऑपरेशन साठी 25 हजारांची मदत*

*AJ24Taas News Maharashtra*
---------------------------------------
 टेंभुर्णी ( प्रतिनिधी ): सध्या जगाला भेडसावत असलेल्या कोरोना रोगामुळे देशातील सर्व शाळा बंद आहेत.त्यामुळे विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होवू नये म्हणून सर्व शाळांनी ऑनलाईन शिक्षण पद्धत सुरु केली आहे.ऑनलाइन शिक्षणासाठी ऍण्ड्रॉइड मोबाईल विद्यार्थ्याकडे असणे आवश्यक आहे,परंतु जे श्रीमंत आहे व ज्यांची परिस्थिती चांगली आहे अशी लोकं आपल्या पाल्यांना मोबाईल घेऊन देऊ शकतात.परंतु अत्यंत गरीब परिस्थिती असणारे व हातावार पोट असणाऱ्यांनी आपल्या पाल्यांना ऍण्ड्रॉईड मोबाईल कसे दयायचे हा प्रश्न निर्माण होतो.टेंभुर्णी येथील आवर ओन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष बशीर जहागिरदार यांनी टेंभुर्णी येथील अत्यंत गरीब व गरजू अश्या 20 विद्यार्थ्याना सॅमसंग कंपनीचे ऍण्ड्रॉइड मोबाईल देऊन एक नवीन उपक्रम राबविले आहे.

      टेंभुर्णी येथील कन्या प्रशाला,जनता विद्यालय, आश्रमशाळा, रयत शिक्षण संस्था, परितेचे विनायकराव पाटील शिक्षण संस्था तसेच बेंबळे येथील विमलेश्वर शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्याना हे मोबाईल देण्यात आले आहेत.या सर्व शाळांकडून गरीब विद्यार्थ्याची नावे मागवून घेण्यात आलेली होती व त्या प्रमाणे खऱ्या गरजू विद्यार्थ्याना ही मदत करण्यात आली आहे.
       निमगाव(टें) येथील संदीप प्रकाश लांडगे यांच्या ब्रेन ट्यूमरचे ऑपरेशन सोलापूर येथील डॉ.वलसंगकर यांच्या हॉस्पिटलमध्ये ऑगस्ट 2020 मध्ये करण्यात आले होते.ऑपरेशन साठी 3 लाखापेक्षा जास्त खर्च आला होता.परिस्थिति गरीब असल्याने दवाखान्याचा खर्च पेलने लांडगे यांना शक्य न्हवते.डॉक्टरांच्या ऑपरेशनचे खर्चाचे बाकी असलेले पेमेंट देण्यासाठी आवर ओन फाउंडेशन यांनी संदीप लांडगे यांना 25 हजारांची आर्थिक मदत केली आहे.
      रेशनकार्ड नसलेले परप्रांतीय व गरजूंना प्रत्येकी 25 किलो गहू व 5 किलो तांदूळ असे 40 कुटुंबियांना धान्य वाटप फाउंडेशनतर्फे करण्यात आले आहे.यापूर्वी देखील आवर ओन फाउंडेशन यांनी गरीब विद्यार्थी व आरोग्यासाठी अनेक लोकांना आर्थिक मदत केलेली आहे.टेंभुर्णी एस.टी.स्टैण्ड मध्ये गतवर्षी उन्हाळ्याचे संपूर्ण 4 महीने जारचे आरओ फ़िल्टर चे थंड पाणी प्रवाशांना पुरवले होते.त्यासाठी फाउंडेशनने दीड लाख रुपये खर्च केले होते.त्या उपक्रमासाठी सोलापूर रा.प.म.चे विभाग नियंत्रक .रमाकांत गायकवाड यांनी संस्थेचे अध्यक्ष  बशीर जहागिरदार यांचा त्यावेळेस  सत्कार देखील केला होता.
       मोबाईलचे व धान्याचे वाटप पो.नि.श्री राजकुमार केंद्रे, स्टेट बँक ऑफ इंडिया टेंभुर्णीचे शाखेचे प्रबंधक  राजेंद्र जाधव साहेब व बँक ऑफ इंडियाचे प्रबंधक .मौर्या साहेब,टेंभुर्णीचे सरपंच प्रमोद कुटे, भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष योगेश बोबडे यांचे हस्ते करण्यात आले या वेळी फाउंडेशनचे उपाध्यक्ष अनिल उत्तम जगताप,राहुल टिपाले, उपसरपंच रुपालीताई धोत्रे,सुहास पाटील,दिलीप भोसले,ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब महाडीक,गिरीष ताबे, डॉ माने, बाळासाहेब  ढेकणे, सातपुते सर,नानासाहेब ढवळे, गोरख खटके सर, ग्रामसेवक मधुकर माने,अमोल जगदाळे,शिवाजी गोंदील,रेवन क्षीरसागर,
दहिवलीचे सरपंच तय्यब जहागिरदार,परमेश्वर खरात,रणधीर जगताप,निखिल खरात,तात्यासाहेब खरात, रमेश लोंढे तसेच फाउंडेशनचे सदस्य अजित जहागिरदार,समीर जहागिरदार, मोहसीन शेख,संतोष सोनवणे, सागर जगताप,सुनील लोंढे,विशाल खरात, पप्पू राजगुरु,विकी गोंदील,शुभम कानाडे, हे उपस्थित होते.सर्वांचे आभार आवर ओन फाउंडेशनचे अध्यक्ष बशीर जहागिरदार यांनी फाउंडेशनला डोनेशन देणाऱ्यांचे व आलेल्या सर्व प्रतिष्ठीत व्यक्तींचे आभार मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा