*उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय तुळजापूर येथे शिवसेनेच्या वतीने सॅनिटायझर स्टॅंड भेट*
तुळजापूर प्रतिनिधी रूपेश डोलारे
AJ 24 Taas News Maharashtra
तुळजापूर दि.
शिवसेनेच्या वतीने कोरोना सारख्या संकटात एका योद्धाप्रमाणे कार्य करणारे महाराष्ट्र पोलिसांच्या मदतीसाठी शिवसेना सदैव तत्पर तुळजापूर येथील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयास सॅनिटायझर स्टॅंड भेट देण्यात आले.
यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप टिपरसे यांनी बोलतांना कोरोनासारख्या महामारीच्या काळात तुळजापूर तालुक्यात शिवसेनेच्या वतीने जे अविरतपणे कार्य चालू आहे ते कौतुकास्पद आहे असे मत व्यक्त केले.यावेळी स.पो.नि शरदचंद्र रोडगे,तुळजापूर शिवसेना शहरप्रमुख सुधीर(भाऊ)कदम उपशहरप्रमुख बाळासाहेब शिंदे,बापूसाहेब नाईकवाडी,शिवसेना उपतालुकाप्रमुख रोहित नागनाथराव चव्हाण,विद्यार्थीसेना उपजिल्हाप्रमुख विकास भोसले,शिवसेना सोशल मिडीया तालुकाप्रमुख चेतन बंडगर,ग्राहक संरक्षण कक्ष शहरप्रमुख स्वरूप कांबळे, समाधान ढवळे,उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा