छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने बीडीचे उत्पादन बंद करावे,, शिवधर्म फाऊंडेशनचे इंदापूर तहसील कचेरीसमोर एक दिवशीय आंदोलन,,
इंदापूर प्रतिनिधी: /शिवाजी पवार
*Aj24Taas News Maharashtra*
महराष्ट्रात धूम्रपान करणाऱ्या किरकोळ बिडीस छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव दिले गेले असून हे महाराष्ट्रातील तमाम संभाजी महाराज प्रेमी जनतेचा अपमान असून त्वरित महाराजांचे नाव बिडीस देने बंद करावे, अशी मागणी करत शिवधर्म फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने संस्थापक, अध्यक्ष मा. दिपक आण्णा काटे यांच्या नेतृत्वाखाली, इंदापूर तहसील कार्यालयासमोर एक दिवशीय धरणे आंदोलन करण्यात आले.
साबळे वाघीरे अाणि कंपनी मध्ये बिडीस संभाजी बिडी या नावाने उत्पादन व विक्री केली जाते, या विरोधात तत्काळ कंपनी विरोधात कारवाई करून छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव उत्पादन केलेल्या बिडी चे तत्काळ हटवले जावे अशी मागणी शिवधर्म फाऊंडेशन च्या वतीने करण्यात आली.
या वेळी या धरणे अंदोलनात दिपक काटेचे वडील सीताराम ( नाना ) काटे, शिवधर्म फांऊडेशनचे पुणे जिल्हाध्यक्ष दत्ताञय जगताप, सोमनाथ चव्हाण, सर्जेराव कांबळे, रुपेश कांबळे, मंथन पवार, समीर मुलांनी,रोहन कांबळे, साजन ढावरे, अक्षय चव्हाण, नारायण चव्हाण, प्रणव गवळी, संजय खंडागळे, भैय्यासाहेब शिंदे, नारायण कांबळे, उमाजी जाधव, गणेश बुधावले,ओंकार साळुंखे, तेजस सूर्यवंशी,आदी कार्यकर्ते उपस्थित होते. वरील अंदोलनास भटक्या विमुक्त जमाती संघटनेचे प्रदेश सरचिटणीस मा. तानाजीराव धोञे व त्यांचे सर्व सहकारी, शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष गुलाबराव फलफले व त्यांचे सर्व कार्यकर्ते, लहुजी शक्ती सेना या सर्वानी पाठिबा देउन अंदोलनात प्रत्यक्ष सहभाग घेतला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा