*सोलापूर ग्रामीण मध्ये 435 तर शहरात 48 पॉझिटिव्ह ग्रामीण मध्ये 14 जणांचा मृत्यू*
******************************
*सोलापूर/ प्रतिनिधी*
*AJ 24 Taas News Maharashtra*
सोलापूर दि., 28.
सोलापूर महापालिका क्षेत्रात
आज 395 रिपोर्ट प्राप्त झाले असुन त्या मध्यें 48 पॉझिटिव्ह रुग्ण मिळाले आहेत. आज तब्बल 137 जण कोरोना मुक्त झाले आहेत .शहरात आज कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद नाही.
शहरात आजवर 8299 पॉझिटिव्ह रुग्ण मिळाले. 467 जणांचा कोरोना मुळे मृत्यू झाला. 6951 जण कोरोना मुक्त झाले तर 881 जणांवर उपचार सुरू आहेत.
सोलापूर ग्रामीण मध्ये आज 2319 अहवाल प्राप्त झाले या 435 पॉझिटिव्ह रुग्ण मिळाले आहेत. आज ग्रामीण मध्ये चौदा जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद आहे. तर 215 जण कोरोना मुक्त झालेत.
आजवर सोलापूर ग्रामीणमध्ये 23996 पॉझिटिव्ह रुग्ण मिळाले. यातील 17061 बरे झाले तर 659 जणांचा आज वर मृत्यू झाला आहे. सध्या 6276 जणांवर उपचार सुरू आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा