Breaking

सोमवार, २८ सप्टेंबर, २०२०

युवकांनो, नोकरीपेक्षा उद्योगधंद्यात करियर करा.सभापती..विक्रमदादा शिंदे




युवकांनो, नोकरीपेक्षा उद्योगधंद्यात करियर करा.सभापती..विक्रमदादा शिंदे



बेंबळे प्रतिनिधी /सचिन शिंदे
युवकांनी नोकरीच्या मागे न लागता उद्योग व्यवसायामध्ये उतरून उद्योग व्यवसाय केला तर अनेकांना नोकरी उपलब्ध होऊ शकतील. आणि त्यातून ग्रामीण भागामध्ये रोजगार निर्माण होईल त्यामुळे युवकांनी शेतीसोबत जोडधंदा म्हणून वेगवेगळे व्यवसाय करावेत असे प्रतिपादन पंचायत समिती माढा चे सभापती विक्रम दादा शिंदे यांनी केले.
 बेंबळे येथील युवकांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या होलसेल किराणा माँल दुकानाच्या उद्घाटन प्रसंगी विक्रम दादा शिंदे बोलत होते .ग्रामीण भागातील युवकांमध्ये जिद्द आणि चिकाटी ची कमी नाही फक्त त्याला संधी मिळायला हवी. पण सध्याच्या परिस्थितीचा विचार करता संधी मिळण्याची वाट न पाहता आपण स्वतः संधी निर्माण करावी आणि जिद्दीने आणि चिकाटीने व्यवसाय उभा करावा. म्हणजे नोकरीसाठी आपल्या परिसरातून पुणे मुंबईला जावे लागणार नाही. आपल्या तालुक्याच्या साखरपट्ट्या मध्ये दरवर्षी हजारो ऊसतोड कामगार आणि त्यांचे कुटुंब येतात, त्याला अनुसरून व शेतीशी संबंधित व्यवसाय उद्योग उभे राहावेत त्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करत असतो. त्याचबरोबर जर कोणी स्वतःहून पुढे आले तर त्याला हवी ती मदत देण्याची नाही मी या ठिकाणी देतो.
नविन व्यवसाय उभा करणारा युवक संदेश मनोहर पवार याचे तोंड भरुन कौतुक केले.
यावेळी बेंबळे गावचे माजी सरपंच ,तंटामुक्त समितीचे अध्यक्ष गोविंद भोसले सर,सोसायटी चे माजी अध्यक्ष संजय पवार,बेंबळेचे उपसरपंच एकनाथ भोसले,माजी उपसरपंच अमर पवार,तात्यासाहेब पवार,मनोहर पवार,डाँ.भिमराव पवार,माजी उपसरपंच सोमनाथ हुलगे आदीसह बेंबळेकर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा