.
*रोहितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अाॅनलाईन वकृत्व स्पर्धा-स्वप्नील तनपुरे*
*इंदापूर प्रतिनिधी/ शिवाजी पवार*
*AJ 24 Taas News Maharashtra*
इंदापूर/राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवा नेतृत्व कर्जत तालुक्याचे कर्तव्यतप्तर आमदार श्री. रोहितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी विद्यार्थी काॅंग्रेस पार्टीच्या वतीने ऑनलाइन वकृत्व स्पर्धा घेण्यात येत अाहे. सर्व वयोगटातील विद्यार्थी व विद्यार्थींनी या स्पर्धेत सहभाग घेऊ शकतात. या स्पर्धेचे विषय पुढील प्रमाणे. :— १) मी अनुभवलेले रोहितदादा पवार
२) पवार साहेबांचे सामाजिक योगदान
३) अाॅनलाईन शिक्षण प्रणाली.... योग्य की अयोग्य?
४) तरुणांनी राजकारणात का यावे?
वरील पैकी एका विषयावर पाच मिनटाचे भाषण तयार करुन विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत भाग घ्यावा. असे अावाहन राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस कर्जत तालुकाध्यक्ष. स्वप्नील तनपुरे, ओंकार गुंड व श्री.गणेश सुद्रीक यांनी पञकारांशी बोलताना माहिती दिली.
***********************************************
कोरोना महामारीचे संकट संपुर्ण राज्यात मोठ्या प्रमाणात वाढत अासल्यामुळे संपूर्ण राज्यातील जनतेने कामाशिवाय घराबाहेर पडू नये. असे सरकार आवाहन करत आहे. आणि जनता ही त्याला चांगला प्रतिसाद देत आहे. अाश्यातच कर्जत जामखेड मतदारसंघाचे तरुण आमदार व राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्राचे युवा नेतृत्व मा. अामदार रोहीतदादा पवार यांचा वाढदिवस येत्या २९ सप्टेंबरला येत आहे. अावघ्या काही दिवसांतच संपूर्ण कर्जत वासियांसाठीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात एक युवा नेतृत्व म्हणुन लोकप्रियता मिळवल्या मुळे संपूर्ण महाराष्ट्रात त्यांच्या मोठ्या प्रमाणात चाहता वर्ग तयार झाला आहे. आपल्या नेत्याचा वाढदिवस म्हणजे प्रत्येक कार्यकर्त्यांनसाठी एक मोठा उत्साह असतो. परंतु सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमी मुळे गर्दी करणे किंवा उत्साहात वाढदिवस साजरा करणे योग्य होणार नाही.
त्यामुळे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस कर्जत तालुका यांनी ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा आयोजित केली आहे. यामध्ये सदर स्पर्धेचा पाच मिनटाचा व्हिडिओ काढून ७७७४९२०४०१. / 7774920401 या व्हाट्सअप नंबर वरती पाठवयाचा आहे. तसेच व्हिडिओ पाठविण्याचा अंतिम दिनांक १ ऑक्टोंबर २०२० पर्यंत असल्याचे आयोजकांनी यावेळी सांगातले अाहे.
त्याच बरोबर ही स्पर्धा फक्त कर्जत जामखेड मधील विद्यार्थ्यांसाठीच आयोजित केलेली आहे असहीे आयोजकांनी सांगितले आहे.
यामध्ये आकर्षक बक्षीस वितरण केले जाणार असून प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पैलवान राजेंद्र ( काका ) गुंड ५५५५ रु.
द्वितीय पारितोषिक स्वप्निल तनपुरे ४४४४ रु. व तृतीय पारितोषिक ३३३३ रु. . रणजीत घनवट, यांच्या वतीने देण्यात येणार आहे.
या स्पर्धेत कर्जत जामखेड तालुक्यातील विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त सहभागी होऊन अापले वकृत्व सिद्ध करावे. बक्षिस हे प्रोस्हानपर दिले जाणार अासुन बक्षिसासाठी नाही तर अापले वकृत्व दाखवनेसाठी विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा. असे आवाहन कर्जत तालुका विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष स्वप्निल तनपुरे, . गणेश सुद्रिक ( कार्याध्यक्ष रा. वि. काॅं. ) व ओंकार गुंड या अायोजकांनी केलेली आहे. तसेच या कार्यक्रमासाठी संदीप बोरुडे, इम्रान शेख, अभिमान शेळके, सुरज मोरे, . सागर बांदल व प्रशांत गदादे यांनी मोठ्या प्रमाणात परिश्रम घेतले अाहेत.
******advt ************************************
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा