मुस्लिम आरक्षण निर्णायक आंदोलन चे.आ.भीमराव केराम यांना निवेदन...
*aj24Taas News Maharashtra*
नांदेड प्रतिनिधी/बालाजी सिरसाट
नांदेड दि.26.
10% मुस्लिम आरक्षणासाठी किनवट व माहुर चे आमदार मा.भिमरावजी केराम साहेबांना निवेदन देऊन विधानसभेत मुस्लिम आरक्षणाची बाजू मांडण्याची विनंती करण्यात आली.
मागील काही काळात मुस्लिम समाजाची राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक स्थिती अतीमागास झालेली आहे हे महेमुदूर्रहेमान कमीशन,सच्चर कमीशन आणी रंगनाथ मिश्रा कमीशन या आयोगानी आपल्या अहवालात सिद्ध करून "मुस्लिम समाजास" मुख्य प्रवाहात आनन्या साठी मुस्लिम समाजास त्याच्या मागासले पनाच्या आधारवर आरक्षण देन्याची पुरजोर मागनी केली आहे त्यावर आधारित १०. टक्के आरक्षण मिळण्या बाबत *मुस्लिम आरक्षण निर्णायक आंदोलन तर्फे* किनवट व माहुर चे आमदार भिमरावजी केराम साहेब यांना निवेदन देउन विधान सभेत मुस्लिम आरक्षणाचा पाठपुरावा करण्याची विनंती करण्यात आली.
यावेळी समस्त मुस्लिम बांधव उपस्थित होते...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा