Breaking

शनिवार, २६ सप्टेंबर, २०२०

टेंभुर्णी शहरातील तरुणाने अज्ञात कारणाने गळफास घेऊन केली आत्महत्या. *******************************


*टेंभुर्णी शहरातील तरुणाने अज्ञात कारणाने गळफास घेऊन केली आत्महत्या*
******************************
टेंभुर्णी( प्रतिनिधी ):-येथील  शुक्रवार पेठ दत्त मंदिराजवळ राहणाऱ्या रामचंद्र बादल यांनी राहत्या घरात कोणी नसल्याने अज्ञात कारणावरून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खबर लक्ष्मण देवराव बादल (वय. ४३) रा. कुटे वस्ती टेंभुर्णी ता. माढा यांनी टेंभुर्णी पोलीस ठाण्यात दिली आहे.

टेंभुर्णी पोलिसांकडून सविस्तर मिळालेली माहिती अशी की टेंभुर्णी येथील रामचंद्र देवराव बादल (वय.३८) रा. दत्त मंदिर जवळ शुक्रवार पेठ टेंभुर्णी  तालुका माढा जिल्हा सोलापूर याने राहत्या घरी दरवाजासमोर पत्र्याच्या शेडच्या वाशाला घरातील जुन्या साडी सारख्या असणाऱ्या कापडाने  गळ्याला बांधून फास घेतला असून ही घटना शुक्रवारी सकाळी १० वाजता त्याची पत्नी  गावाला गेले होती ती परत आल्यानंतर ही घटना उघडकीस आली असून रामचंद्र बादल याने अज्ञान कारणावरुन घरात कोणी नसल्या चे पाहून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची टेंभुर्णी पोलीस ठाण्यात नोंद झाली असून पुढील तपास टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पो. ना. शेख करीत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा