Breaking

शनिवार, २६ सप्टेंबर, २०२०

पुयनी,नांदेड येथे जिजाऊ ब्रिगेडची ग्राम शाखा स्थापना...


पुयनी,नांदेड येथे जिजाऊ ब्रिगेडची ग्राम शाखा स्थापना...

नांदेड प्रतिनिधी बालाजी /सिरसाट

पुयनी,नांदेड येथे जिजाऊ ब्रिगेडची ग्राम शाखा स्थापन करण्यात आली.शाखा अध्यक्ष पदी राधिकाताई पावडे उपाध्यक्ष,सचिव,कार्याध्यक्ष तसेच सहसचिव पदी अनुक्रमे शारदाताई पावडे, ताराबाई पावडे ,आदींची निवड करण्यात आली.



ही नियुक्ती नांदेड जिजाऊ ब्रिगेड जिल्हाध्यक्षा ( उ )डॉ विद्या पाटील यांनी केली याप्रसंगी नांदेड जिजाऊ ब्रिगेड जिल्हाध्यक्षा (द ) शिवमती अरुणाताई जाधव यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.दोन्ही जिल्हा अध्यक्षांनी नवनिर्वाचित कार्यकारिणीतील महिलांची नियुक्तीपत्र,जिजाऊ चरित्र  देऊन सन्मान केला.डॉ विद्या पाटील यांनी उपस्थित महिलांना जिजाऊ ब्रिगेड संघटना कार्यप्रणाली याबद्दल मार्गदर्शन केले.तर अरुणाताई जाधव यांनी महिलांना जिजाऊ चरित्र सांगून प्रेरित केले.तसेच जिजाऊ ब्रिगेड तर्फे आयोजित स्पर्धेच्या विषयी माहिती दिली..


यावेळी शिवश्री प्रा.बालाजी पावडे यांनी महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी बचत गट व लघू उद्योग उभारणी संदर्भात माहिती दिली.

नवनिर्वाचित ग्राम अध्यक्षा राधिकाताई पावडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले व उपस्थितांचे आभार मानले...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा