Breaking

मंगळवार, १५ सप्टेंबर, २०२०

शिवधर्म फाउंडेशनचे कार्य उल्लेखनीय- स्वप्निल तनपूरे


शिवधर्म फाउंडेशनचे कार्य उल्लेखनीय- स्वप्निल तनपूरे 


शिवधर्म फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष मा. दिपक अण्णा काटे यांचा वडगाव तनपूरे येथे राष्ट्रवादी विद्यार्थी काॅंग्रेसचे तालुका अध्यक्ष मा. स्वनिल तनपूरे यांच्या निवास स्थानी केला सत्कार.

इंदापूर प्रतिनिधी शिवाजी पवार

महाराष्ट्रात गेल्या ८८ वर्ष  साबळे वाघिरे आणि कंपनीने  धुम्रपान करण्याचे साधन असणाऱ्या विडीस छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देऊन आपला व्यवसाय सुरू ठेवला होता.त्या मुळे छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांना आपले आराध्य दैवत मानत असलेल्या महाराष्ट्रातील तमाम बहुजनांच्या भावना दुखावल्या जात होत्या.त्यामुळे छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव विडी वरुन हटवण्यासाठी शिवधर्म फाउंडेशन महाराष्ट्र राज्य चे संस्थापक अध्यक्ष दिपक अण्णा काटे यांनी पुरंदर च्या पायथ्याशी ४-९-२०२० ते ८-९-२०२० पाच दिवस आपल्या ५ ते ६ सहकार्यान सोबत आमरण उपोषण केले.याचा उद्रेक संपुर्ण महाराष्ट्रात होऊ लागला .व जे गेल्या ८८ वर्षात जे झाले नाही ते अवघ्या ५ दिवसात साबळे वाघिरे आणि कंपनी च्या मालकाने पत्रकार परिषद घेऊन आम्ही नाव बदलण्यास तयार आहोत असे जाहीर केले.

त्यामुळे कर्जत तालुका राष्ट्रवादी विध्यार्थी कॉंग्रेस चे अध्यक्ष स्वप्निल तनपूरे यांनी शिवधर्म फाउंडेशन महाराष्ट्र राज्य चे संस्थापक अध्यक्ष दिपक अण्णा काटे यांचा वडगाव तनपूरे येथे आपल्या निवासस्थानी मानाचा फेटा, हार व श्रीफळ देऊन सत्कार केला.

यावेळी तनपूरे म्हणाले छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज हे संपुर्ण महाराष्ट्राची अस्मिता आहे .त्याचा याच महाराष्ट्रात रोज होणारा अवमान रोखण्यासाठी शिवधर्म फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष दिपक अण्णा काटे व त्यांचे सहकारी यांनी पुरंदर च्या पायथ्याशी आमरण उपोषण केले.व संपूर्ण महाराष्ट्रात याचे तीव्र पडसाद उमटल्यामुळे अाखेर साबळे वाघिरे आणि कंपनी यांच्या मालकांनी पत्रकार परिषदेत नाव बदलणार असल्याची माहिती दिली.जे ८८ वर्षांत झाले नाही ते अवघ्या ५ दिवसात करुन दाखवले हे काम खरच उल्लेखनीय आहे.त्याच्या हातुन समाजाची सेवा अशीच घडत राहो .व त्यांच्या या पुढील वाटचालीसाठी राष्ट्रवादी विध्यार्थी कॉंग्रेस कर्जत तालुका त्यांना संपूर्ण सहकार्य करुन यापुढे खंद्यालाखंदा लावुन सामाजीक कार्यात सहकार्य करेल. व त्यांनी जे अंदोलन यशस्वी केलेबदल हार्दिक शुभेच्छा ही दिल्या. 

यावेळी कार्यक्रमासाठी  बाळासाहेब तनपूरे, यशवंत तनपुरे, रणजित सरोदे, प्रतिक तनपुरे, अनिकेत तनपुरे, महेश सुद्रीक, अक्षय तनपुरे, सौरभ तनपुरे, सुरज जगदाळे, विवेक तनपुरे व गावातील व पंचक्रोशीतल ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा