Breaking

रविवार, २५ ऑक्टोबर, २०२०

९९ टक्क्याहून अधिक कोरोनो रुग्ण बरे होण्याचा देशात "कुर्डुवाडी"चा पहिला क्रमांक...* **************. कुर्डूवाडी प्रतिनिधी अरुण कोरे**AJ 24 Taas News Maharashtra*




*९९ टक्क्याहून अधिक कोरोनो रुग्ण बरे होण्याचा देशात "कुर्डुवाडी"चा पहिला क्रमांक...*   


******************************
*कुर्डूवाडी प्रतिनिधी अरुण कोरे*
*AJ 24 Taas News Maharashtra*

कुर्डूवाडी दि.  *नगरपालीका,ग्रामीण रुग्णालय,पोलिस,महसूल प्रशासनाची यशस्वी कामगिरी...*
     *मात्र खाजगी वैद्यकीय क्षेत्रांची भामटेगिरी चव्हांट्यावर...*
      *मास्क, मर्यादांची "सिमा" न ओलांडण्याचे सिमोलंघनानिमित्त आवाहन...*

       *कुर्डुवाडी शहरात सर्वांच्या सहकार्याने कोरोनाची साखळी तोडण्यात गेल्या पंधरवड्यात चांगलेच यश आले आहे.एवढेच नव्हे तर "बुलेटिन" लिहिताना कोरोनोचे गांभीर्य लक्षात न घेता अनेक अंगांनी कांहीजण प्रश्र्नही उपस्थित करून शासंकताही निर्माण करीत होते.*
     *आज आकडेवारीनेच चोख कामगिरी स्पष्टपणे अधोरेखित केली आहे असे देशात एक नंबरचे काम "कुर्डुवाडी"करांनी दाखवून दिले आहे.*
      *कुर्डुवाडीत दसरा अखेरपर्यंत संशयीत ३५५० रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे.त्यामध्ये ५२२ रुग्ण कोरोनो पाॅझीटीव्ह आढळून आले आहेत.त्यामध्ये २२ रुग्ण कुर्डुवाडीत सुविधा नसल्याने व योग्य ते वेळीच उपचार न झाल्याने (बहुतांश परगावीच)  मृत्युमुखी पडले आहेत.हे प्रमाण सुमारे चार टक्के असले तरी सोलापूर शहराच्या व जिल्ह्याच्या तुलनेत निम्म्याने कमी आहे हेही विशेषत्वाने स्पष्ट दिसून येते.*
      *कुर्डुवाडी शहरातील वैद्यकीय क्षेत्रातील भामटेगिरी या काळात चांगलीच चव्हाट्यावर आली असून योग्य त्या सुविधा उपलब्ध झाल्या असत्या व वेळीच योग्य ते उपचार झाले असते तर त्यांनाही प्राण गमवावे लागले नसते.सविस्तर त्याचाही पंचनामा यथावकाश सविस्तरपणे करण्यात येईलच.*
    *तर एकूण तपासणीत रुग्णांचे  चौदा टक्के पडलेले प्रमाण हेही जिल्ह्यातील सोलापूर,बार्शी, पंढरपूर व इतर न.पा.च्या तुलनेत फारच कमी आहे.*  
       *कुर्डुवाडी शहरात एकूण ५५ कन्टोंन्मेट झोन झाले.त्यामध्ये विशेषत्वाने सिध्देश्वर नगर,पटेल चौक,माढा रोड,सातव काॅलनी,परबत संकूल,व सुरुवातीचे टेंभुर्णी रोड साई काॅलनी व चौधरी प्लाॅट हेच हाॅटस्पाॅट ठरले.*
      *अखेरच्या टप्प्यात सर्वाधिक रुग्ण सिध्देश्वर नगर व जिजामाता नगर येथे आढळून आले हेही विशेषत्वाने नमुद करावे लागेल.*
     *आता ५५ पैकी फक्त साई काॅलनी,सिंध्देश्वर नगर,गोल काडादी चाळ, आदर्श नगर एवढेच कंटोन्मेंट राहीले आहेत.*
      *आज संपूर्ण देशाचा विचार करता रिकव्हरी दर ८९.७८ आहे.महाराष्ट्रानेही चांगलीच कामगिरी करत८८.७८केला आहे.*
      *भारतातील दहा मोठ्या शहरांचा रिकव्हरी दर कालच घोषित करण्यात आला आहे.त्यामध्ये पुणे शहराचा रिकव्हरी दर सर्वात अधिक ९२ टक्के आहे.*
       *कुर्डुवाडी शहराचा विचार करता एकूण ५२२ रुग्णांपैकी २२ जण मृत आहेत.राहीलेल्या ५०० पैकी ४९६ जणांचीही सुखरूप घरवापसी झाली आहे.अवघे चार रुग्ण राहीले आहेत.हे प्रमाण देशाच्या व पुण्याच्या तुलनेत पहाता कुर्डुवाडी शहराचा रिकव्हरी दर ९९.२६असा सर्वाधिक असा स्पष्टपणे असल्याने कुर्डुवाडी शहराने संपूर्ण भारतात पहिला क्रमांक पटकावला आहे असे म्हंटले तर वावगे ठरू नये.*
       *कुर्डुवाडीतील ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ.संतोष अडगळे व डॉ.सुनंदा रणदिवे (गायकवाड),माजी,आजी मुख्याधिकारी कैलास गावडे, समीर भुमकर, आरोग्य निरीक्षक तुकाराम पायगण,प्रांत अधिकारी श्रीमती ज्योती कदम व पोलीस उपअधीक्षक विशाल हिरे,स.पो. निरीक्षक चिमणाजी केंद्रे यांची पथके व त्यांचे असंख्य सहकारी स्वत: आजारी असताना सामाजिक बांधिलकीतून सर्वांनी मिळून केलेल्या प्रयत्नांमुळे कुर्डुवाडी शहर कोरोनो मुक्तीच्या अंतीम टप्प्यात असून नागरिकांनीही जनता कर्फूबरोबरच स्वकर्फू स्विकारुन चांगलेच योगदान दिले असल्याने कुर्डुवाडीकरांनी अशीच सतर्कता दाखविण्याचे आवाहन कायमच आहे.*
     *नगराध्यक्ष समीर मुलाणी, उपनगराध्यक्षा सौ.उर्मिला हरीदास बागल,आ.स.सभापती सौ.वनिता सातव,सर्व नगरसेवक(सर्वांची नावे अधोरेखित) मुकादम सुरेश कदम,सहाय्यक शिवाजी खवळे सर्व आरोग्य सेवक यांनीही आपापल्या योगदानाप्रमाणे वेळोवेळी चांगलीच कामगिरी केली आहे.* 
    *कोरोनोचे संकट लगेच संपणारे नसल्याने नागरिकांनी अतिदक्षता घेऊन सतर्कच मास्कसह रहाण्याचे आवाहन कायमच आहे.*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा