Breaking

रविवार, २५ ऑक्टोबर, २०२०

धर्मवीरगडाची शंभूभक्तांनी केली दुर्गपूजा



धर्मवीरगडाची शंभूभक्तांनी केली दुर्गपूजा 
         

*AJ 24 Taas News Maharashtra
श्रीगोंदा प्रतिनिधी/


        ऐतिहासिक किल्ले धर्मवीरगड पेडगाव (ता.श्रीगोंदा) येथे विजयादशमीचे औचित्य साधून दुर्गपूजा करण्यात आली.गतकालीन किल्याचे महत्व हे अनन्यसाधारण होते.किल्यांच्या प्रत्येक दगडाने हा पराक्रमाचा,बलिदानाचा इतिहास पाहिला आहे.हा ऐतिहासिक ठेवा जपणे काळाची गरज आहे.
         छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगड किल्ल्यावर भवानी देवीच्या उत्सवाला याच दिवशी प्रारंभ केला.साडेतीन मुहूर्तातील एक मुहूर्त मानल्या गेलेल्या विजयादशमीला शुभ कार्य संपन्न केली जातात.दसऱ्याच्या दिवशी गावाच्या सीमा ओलांडून जाण्याची प्रथा प्रचलित होती. अपराजिता देवीला मला विजयी कर असा आशीर्वाद घेतला जात.त्यानंतर योद्ध्यांनी शस्त्र पूजन करण्याची प्रथा होती.
         दसरा सण मोठा, नाही आनंदाला तोटा' या काव्यातच ह्या सणाची महती गौरवलेली आहे. दसरा हा पराक्रमाचा, पौरुषाचा सण आहे.आज सर्व समाज एकत्र येऊन सरस्वतीचे पूजन व शस्त्रपूजन करत असतो. टीम धर्मवीरगड व शिवदुर्ग संवर्धन यांनी प्रथेप्रमाणे गडपूजा करत झेंडूची तोरणे बांधली.चपटनाथ मारुती,ग्रामदैवत भैरवनाथ मंदिर,रामेश्वर मंदिर,मल्लिकार्जुन मंदिर,बालेश्वर मंदिर,लक्ष्मीनारायण मंदिर,मुख्य रायप्पा वेस,राजवाडा प्रवेशद्वार यांना तोरणे बांधण्यात आली.तसेच संभाजी महाराजांच्या बलिदानाचे स्मरण करून देणारा शौर्य स्तंभ आहे.या शौर्यस्तंभाची शंभभक्तांनी पूजा केली फुलांची भव्य रास घालत मनोभावी सेवा केली.या वेळी महाराजांचा जयघोष करण्यात आला. तसेच प्रतीक पाचपुते यांनी महाराजांची गारद देत वातावरण उल्हासदायक केले होते.टीम धर्मवीरगडचे मावळे सागर शिर्के व कालिदास कोथिंबीरे यानी झेंडूची तोरणे दिली.
       शंभुभक्तांद्वारे आपल्या ऐतिहासिक ठेव्याचे जतन व संवर्धन करण्यासाठी दुर्गपूजा केली.छत्रपती संभाजी महाराजांच्या रक्तरंजित इतिहासाचे चिरस्मरण व्हावे.आपल्या स्वाभिमानाचा वारसा पूजनीय आहे या प्रेरणेतून हे कार्य केले आहे.या प्रसंगी डॉ.निलेश खेडकर,प्रतीक पाचपुते,सागर शिर्के,कालिदास कोथिंबीरे,लाला आवचर,रोहित मोहिते,विनायक डाळिंबकर,राहुल सुपेकर,मंगेश सुपेकर,बाळासाहेब सुपेकर,सोमनाथ सुपेकर,उमेश तोरडमल,नाना सांगळे,सिद्धांत खेडकर,चेतन खेडकर,अशोक गोधडे,तेजस खेडकर,विशाल पाचपुते,राहुल परकाळे,प्रा.राजेश बाराते,गडपाल भाऊ घोडके व नंदकिशोर क्षीरसागर उपस्थित होते. तसेच मोठ्या संख्येने शंभूभक्त उपस्थित होते.

******


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा