Breaking

गुरुवार, १५ ऑक्टोबर, २०२०

**नायगाव तालुक्यातील बरबडा* ते *बरबाडावाडी व* *नायगाव ते लालवंडी रस्त्यांवरिलपुलांचे कामे तात्काळ करा-वसंत सुगावे पाटील**

**नायगाव तालुक्यातील बरबडा* ते *बरबाडावाडी व* *नायगाव ते लालवंडी  रस्त्यांवरिल* *पुलांचे कामे* *तात्काळ करा.* 
       *वसंत सुगावे पाटील** 

नांदेड प्रतिनिधी
बालाजी सिरसाट

नांदेड:नायगाव तालुक्यातील बरबडा ते बरबडावाडी व नायगाव ते लालवंडी रस्त्यांवरील जलसंपदा विभागाच्या पुलाचे लवकरात लवकर काम करावे अशी मागणी राष्ट्रवादी  युवक काँग्रेसचे प्रदेशसरचिटणीस वसंत सुगावे पाटील यांनी अधिक्षक अभियंता  श्री.सब्बीनवार   यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. 

      यावेळी अधिक्षक अभियंता व वसंत सुगावे पाटील यांनी याबद्दल चर्चा करून अधिक्षक अभियंता यानी NMI व NID या दोन्ही विभागांच्या कार्यकारी अभियंताना तात्काळ अंदाजपत्रक तयार करण्याच्या सुचना दिल्या.व संबधीत दोन्ही पुलांचे लवकरात लवकर काम करू असे आश्वासन दिले.







   यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे प्रदेशसरचिटणीस वसंत सुगावे पाटील यांच्यासह राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत मांजरमकर,नितीन मामडी,माधव बेंद्रीकर संतोष गुंडाळे ,अमोल पाटील आदी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा