*संजयमामा शिंदे यांच्या हस्ते कुर्डूवाडीत चार ऑक्सिजन मशीन भेट*
**कन्हेरगाव प्रतिनिधी /धनंजय मोरे*
दि. ०३ (प्रतिनिधी )
येथील "दादा-मामा स्वाभिमानी ३६ गांव"या व्हाट्स अप ग्रुप सोशल मिडिया ग्रुप च्या वतीने कोरोना महामारीचा प्रार्दूभाव रोखण्यासाठी कोविड सेंटरला अत्यावश्यक "ऑक्सिजन मशीन" आमदार संजयमामा शिंदे यांचे हस्ते प्रांताधिकारी ज्योती कदम यांचेकडे सुपूर्द करण्यात आल्या.
यावेळी पंचायत समितीचे सदस्य धनराज शिंदे, विठ्ठल कार्पोरेशन चे कार्यकारी संचालक यशवंत शिंदे, ता.पं.सदस्य शहाजी शिंदे, नगरसेवक आनंद टोणपे ,नगरसेवक नितीन पवार, प्रवीण शिंदे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अडगळे,सोशल मिडिया ग्रुपचे प्रमुख डॉ.विनोद चव्हाण,डॉ.रविराज शिंदे,धनंजय बागल,काॅंग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष धनंजय मोरे,सुधीर बागल,बाबाराजे जगताप व कार्यकर्ते उपस्थित होते.
चौकट
३६ गाव ' या व्हाट्स अप ग्रुप चे प्रमुख डाॅ. विनोद चव्हाण यांनी कोरोना रूग्णालयात ऑक्सिजन मशीन देण्यासाठी ग्रुप मध्ये आवाहन केले. यावेळी या ग्रुपमधील प्रत्येक सदस्यांनी एक हजार, दोन हजार ते पाच हजार रुपये पर्यंत मदतीने चार ऑक्सिजन मशीन खरेदी नंतर प्रांताधिकारी यांच्या कडे देण्यात आल्या.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा