*डॉ अजितकुमार देशपांडे यांची केंद्र सरकारकडून संशोधन सल्लागार समितीवर नियुक्ती*
*AJ 24 Taas News Maharashtra
*सोलापूर /प्रतिनिधी*
सोलापूर दि.03
डॉ अजितकुमार नागेश देशपांडे, माजी सहयोगी अधिष्ठाता, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी यांची राष्ट्रीय भूमी सर्वेक्षण व भूमी उपयोगीता नियोजन संस्था( National Bureau of Soil Survey and Land Use Planning) नागपूर या संस्थेच्या संशोधन सल्लागार समितीवर केंद्र सरकारने नियुक्ती केली आहे. सदरहू संस्था ही भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या (ICAR) अधिनस्त काम करते व भारतातील सर्व आय सी ए आर च्या भूमी सर्वेक्षण संस्थांची शिखर संस्था आहे. भारतातील सर्व शेतजमीनीचे सर्वेक्षण करून त्याची उपयोगिता ठरवणे हे या सर्व संस्थांचे काम आहे.
यापूर्वी वरील संस्थेवर डॉ देशपांडे यांची संस्था व्यवस्थापन समितीचा( Institute Management Committee) सदस्य म्हणूनही. नियुक्ती झालेली आहे.
डॉ देशपांडे यांच्या निवडीचे कृषि क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा