Breaking

शनिवार, ३ ऑक्टोबर, २०२०

टेंभूर्णी येथे कोवीड सेंटर सुरू करण्यात यावे - विनोद पाटील *शरदचंद्रजी पवार साहेब यांना शिवसेनेचे युवानेते विनोद पाटील यांनी दिले निवेदन*Aj 24Taas News Maharashtra


टेंभूर्णी येथे कोवीड सेंटर सुरू करण्यात यावे - विनोद पाटील 
*शरदचंद्रजी पवार साहेब यांना शिवसेनेचे युवानेते विनोद पाटील यांनी दिले निवेदन*
Aj 24Taas News Maharashtra
*भिमानगर प्रतिनिधी/ सतीश काळे*

टेंभूर्णी (प्रतिनिधी):- कोरोना या महाभयंकर रोगाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन टेंभूर्णी (ता माढा) येथे कोवीड सेंटर सुरू करण्यात यावे, असे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्रजी पवार साहेब यांना अकोले खुर्द येथील शिवसेनेचे युवानेते विनोद पाटील यांनी दिले.


टेंभुर्णी व टेंभुर्णी परिसरात कोरोना या महाभयंकर रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. शहरातील अनेक दवाखान्यांमध्ये ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, बेड उपलब्ध होत नसल्यामुळे लोकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. या परिसरातील लोकांना कुर्डूवाडी, माढा याठिकाणी कोवीड सेंटरला जावे लागत आहे. तेथे जास्त रुग्ण झाल्यामुळे सुविधांचा अभाव निर्माण होत आहे. त्यामुळे या भागातील रुग्णांसाठी टेंभूर्णी मध्ये कोवीड सेंटर सुरू करण्यात यावे अशा आशयाचे निवेदन शिवसेनेचे युवानेते विनोद पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्रजी पवार साहेब व सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तामामा भरणे यांना पंढरपूर येथे जाऊन दिले. ते कोरोना या रोगाने पंढरपूर येथील माजी आमदार कै. सुधाकरपंत परिचारक व कै. राजूबापू पाटील व ह भ प रामदास महाराज कैकाडी यांचा बळी घेतला. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात सह पंढरपूर तालुक्यात शोककळा पसरली होती. त्यांच्या कुटुंबीयांना धीर देत, सांत्वन करण्यासाठी  पंढरपूर व भोसे येथे आले होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा