विठ्ठलवाडीत विठ्ठलराव शिंदे कारखान्यामार्फत सभासदांना साखर वाटप
माढा /प्रतिनिधी
- माढा तालुक्यातील विठ्ठलवाडी येथे पिंपळनेर येथील विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमन आमदार बबनराव शिंदे व संचालक रणजितसिंह शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षीप्रमाणे सभासदांना 50 किलो साखरेचे वाटप सवलतीच्या दरात माजी सरपंच बालाजी गव्हाणे व वाचनालयाचे अध्यक्ष रामचंद्र भांगे यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आले.
गळीत हंगाम सन 2019 -20 मध्ये विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्यास गाळपासाठी ऊस दिलेल्या व नियमित अशा एकूण 101 सभासदांना दिवाळीच्या सणासाठी साखर वाटप करण्यात आले.शेतक-यांच्या ऊसाला सातत्याने चांगला दर देण्याबरोबरच दरवर्षी साखर वाटप करण्यात येते त्यामुळे शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.
याप्रसंगी प्रगतशील शेतकरी बबन उबाळे,भिमराव शिंगाडे,प्रा.छगन गुंड, दत्तात्रय खैरे, वाचनालयाचे माजी अध्यक्ष राजेंद्र गुंड,सुनील गायकवाड, नारायण बरकडे,रामलिंग सस्ते, रामहरी जाधव,सिद्धेश्वर कदम, गोपीनाथ तरंगे,शिवाजी जाधव,हनुमंत शिंगाडे,गहिनीनाथ जगताप,धनाजी सस्ते,विजय गव्हाणे,समाधान कोकाटे,सज्जन मुळे,कैलास खैरे,दयानंद शेंडगे,प्रशांत कदम,संदिप मुळे,रोहन कदम,समाधान कदम, सुरज शेंडगे यांच्यासह ग्रामस्थ व शेतकरी उपस्थित होते.
फोटो ओळी- विठ्ठलवाडी ता.माढा येथे विठ्ठलराव शिंदे कारखान्याच्या वतीने सभासदांना साखर वाटप करताना माजी सरपंच बालाजी गव्हाणे, रामचंद्र भांगे व इतर.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा