सारडेवाडी टोल कर्मचारांचे धरणे आंदोलन काँग्रेसच्या माध्यस्तीने अखेर मागे.
इंदापूर प्रतिनिधी शिवाजी पवार
इंदापूर दि. टोल कर्मचारी व कंत्राटी कंपनीच्या विरोधातील २० तारखेला चालू झालेले बेमुदत धरणे आंदोलन अखेर इंदापूर तालुका काँग्रेस पक्षाच्या मध्यस्थीनी आज अखेर मिटले.
सविस्तर माहीती अशी की कर्मचाऱ्यांचे कंत्राट घेणारी नवीन कंपनी जी अाणि जी एम्पायर भारत सर्व्हिस प्रायव्हेट लीमिटेड मागील दहा दिवसापूर्वी कारभार स्वीकारला त्या मधील जुने कर्मचारी लोकांना कंपनीने कुठलीही नोटीस अथवा कुठलेही कारण न देता नवीन करार केला नाही. व त्यांना कामावर रुजू होण्यास मज्जाव केला. कामावर परत घेण्यासाठी सर्व कर्मचारी इंदापूर तहसील कार्यालय समोर आंदोलनाला बसले होते.
पहिल्या दिवशी ऑडव्होकेटे राहुल माखरे, अनिल पवार , गटनेते कैलास कदम, शकील सय्यद, प्रकाश पवार, सुनील कांबळे, समदभाई व बऱ्याच जणांनी आंदोलनासभेट देऊन पाठिंबा दिला . अॅड. राहुल माखरे यांनी देखील टोल कंपनीशी संपर्क साधला .
इंदापूर तालुका कॉग्रेसचे अध्यक्ष श्री. स्वप्नीलभैय्या सावंत यांनी या आंदोलनाला भेट देत त्यांच्या सर्व सहकारी पध्दधिकाऱ्या सहित आंदोलकां बरोबरीने आंदोलनात ठिया मांडला . त्यांनी टोल प्रशासना बरोबर संपर्क साधला तसेच नवीन कंपनीच्या मालकांबरोबर सातत्याने संपर्क साधून दहा ते बारा वर्ष कामावर असलेले कामगारांवरील झालेल्या अन्यायाची कल्पना दिली व कर्मचाऱ्यांना कामावर घेण्यास भाग पाडले .
आज आंदोलनाच्या जागीच सहा कर्मचाऱ्यांना कामावर घेत असल्याचे पञ देण्यात आली व राहिलेल्या ३ कर्मचारांचा प्रश्नही लवकर मार्गी लावु असे आश्वासन दिले.
या प्रसंगी स्वप्नील सावंत म्हणाले की सर्व सामान्यांच्या पाठीमागे काँग्रेस पक्ष कायमच राहिला असून येणार्या काळात देखील तालुक्यातील सर्व सामान्यांच्या प्रश्नसाठी काम करत राहील .
या वेळी तालुका काँग्रेसचे अध्याक्षांसहित कार्याध्यक्ष काकासो देवकर, उपाध्यक्ष बिभीषण लोखंडे , जिल्हा काँग्रेस सरचिटणीस जकिरभाई काझी , काँग्रेस शहर अध्यक्ष तानाजी भोंग , शहर कार्याध्यक्ष चमन भाई बागवान , निवास शेळके, तुषार चिंचकर, चेतन कोरटकर, संतोष शेंडे , उत्तम फाळके , सुरेश लोखंडे व मिलिंद साबळे आदी उपस्तीत होते .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा