Breaking

शुक्रवार, २३ ऑक्टोबर, २०२०

टेंभुर्णी येथे ग्रंथालय व अभ्यासिकेचे कामाला आज पासुन सुरुवात******************************* आवर ओन फाऊंडेशनचा उपक्रम*



*टेंभुर्णी येथे ग्रंथालय व अभ्यासिकेचे कामाला आज पासुन सुरुवात*
*****************************
*आवर ओन फाऊंडेशनचा  उपक्रम*
******************************


*टेंभुर्णी ( प्रतिनिधी)
*टेंभुर्णी व परिसरातील गावातील विद्यार्थींसाठी व वाचक प्रेमींसाठी बँक ऑफ बरोडा जवळ टेंभुर्णी येथे  मोक्याच्या ठिकाणी आजपासुन ग्रंथालय व अभ्यासिकेकचे कामाची सुरुवात करण्यात आली आहे. अत्याधुनिक, वातानुकूलित ग्रंथालय व अभ्यासिका आवर ओन फाऊंडेशनच्या वतीने सुरु करण्यात येणार आहे.*


*ग्रंथालय व अभ्यासिकेसाठी फाऊंडेशनच्या वतीने बँक ऑफ बरोडा जवळ 6 गाळे भाड्याने घेतले गेले आहे.*

*ग्रंथालय व अभ्यसिका पुण्याचे धर्तीवर आधारीत करण्याचे फाउंडेशनचे मानस आहे.या ठिकाणी UPSC,MPSC,व इतर स्पर्धा परीक्षेसाठी आवश्यक असणारे पुस्तके उपलब्ध करून देण्यात येणार आहे.*

*ग्रंथालय व अभ्यसिकेसाठी  मुलींसाठी आणि मुलांसाठी वेगळे विभाग असणार आहे.ग्रंथालय संपूर्ण वातानूकुलीत असुन त्यामध्ये आर ओ फ़िल्टर पाणी व मोफत चहा व कॉफीची सोय करण्यात येणार आहे. टॉयलेटची व्यवस्था असणार आहे.ग्रामीण भागातील विद्यार्थ्याची अडचण लक्षात घेता आवर ओन फाऊंडेशनचे वतीने ग्रंथालय व अभ्यसिका सुरु करण्याचे संकल्प आहे. सदरचा उपक्रम लवकरात लवकर सुरु करण्याचे प्रयत्न करण्यात येणार आहे.*







कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा