*लातुरचे नुतन पोलीस अधिक्षक निखिल पिंगळे यांची उदगीर शहराला भेट* *व शहरातील रस्त्यावर दुचाकीवरून गस्त*
*AJ 24 Taas News Maharashtra*
*प्रतिनिधी जीवन भोसले* मो.9422811817
*अधिक्षक श्री पिंगळे यांनी *aj24taas news* च्या तालुका प्रतिनिधी शी बोलताना दिली.
*उदगीर*(लातूर)लातुरचे नुतन पोलीस अधिक्षक निखिल पिंगळे यांनी गूरूवारी ता,22 सायंकाळी सातच्या दरम्यान शहरातील प्रमुख रस्त्यावरून मोटार सायकलवर गस्त घातली अचानक साहेब मोटारसायकलवर निघाल्याने पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली .
जिल्हा पोलिस अधिक्षक पदभार घेतल्यानंतर प्रथमच पोलीस अधिक्षक श्री पिंगळे यांनी उदगीर शहराला भेट दिली . शहर पोलीस ठाण्यात भेट देऊन बैठक घेतली . त्यानंतर त्यानी पोलिस निरिक्षक गजानन पाटील यांच्या दूचाकीवरून येथिल ऐतिहासिक भूईकोट किल्ल्यातील उदगीर बाबांचे दर्शन घेतले व खाजा बादशहा दर्ग्याला भेट देऊन चादर चढवली .
उदगीर शहरातील ऐतिहासीक सांस्कृतिक व गून्हेगारी पार्श्वभूमीची माहिती घेण़्यासाठी शहरातील रस्त्यावरून कुठल्याही बंदोबस्ताशिवाय दुचाकीवर फिरून माहिती घेतली ,
चौबारा रोड, किल्ला रोड, सराफ लाईन, काँर्नर चौक, छ़. शिवाजी महाराज चौक, बसस्थानक परिसर, देगलुर रोड, मोंढा रोड, डँम रोड, छ. शाहू महाराज चौक, उमा चौक, फुले नगर, गांधी नगर, पत्तेवार चौक, हनुमान कट्टा, या भागात फिरून श्री पिंगळे यांनी गस्त घातली,
या दरम्यान गुन्हे घडणारी ठिकान, अवैध धंदेवाल्यांचे केंद्र, गुटखा, अवैध दारू विक्रीची ठिकानं, मटका चालवनाऱ्या ठिकाणांची पाहणी या वेळी जिल्हा पोलीस अधिक्षक यांनी केलेल्या अवैध धंदेवाल्यांचे धांबे दणाणले , जिल्हा अधिक्षक कोणत्या रस्त्यावरून कोठे येत आहेत हे कोणालाही माहीत नसल्याने पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली ,
उदगीर शहरातील एकंदरीत परिस्थीती पाहिली असता शहरातील मुख्य व अंतर्गत रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण, हातगाडे, बेसिस्त वाहनधारक, रस्ते, नाल़्यांचे मोठ्या प्रमानावर प्रश्न आहेत, या साठी नगरपालिका, व पोलीस प्रशासन व शासणाच्या संबंधीत विभागाने एकत्रीतपणे कामे करणे आवश्यक आहे. येत्या काळात आमची जबाबदारी आम्ही केव्हाही पार पाडण्यासाठी तयार आहोत , चांगले काम करू अशी ग्वाही पोलीस अधिक्षक श्री पिंगळे यांनी *आज 24तास न्यूज* च्या तालुका प्रतिनिधी शी बोलताना दिली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा