Breaking

शनिवार, ३ ऑक्टोबर, २०२०

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वाशिम जिल्हा प्रभारी पदी वसंत सुगावे* *पाटील यांची निवड.*



*राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वाशिम जिल्हा प्रभारी पदी वसंत सुगावे* *पाटील यांची निवड.*
 
नांदेड प्रतिनिधी
बालाजी सिरसाट

 *नांदेड* : राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशसरचिटणीस वसंत सुगावे पाटील यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वाशिम जिल्हाप्रभारी पदी  राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख  यांनी निवड केली आहे.


     वसंत सुगावे पाटील यांनी  पक्षस्थापनेपासून राष्ट्रवादी काँग्रेस  मध्ये सक्रियपणे कार्यरत आहेत.याअगोदर ते राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष,स्वामी रामानंद तिर्थ मराठवाडा विद्यापीठाचे सिनेट सदस्य  म्हणून काम केले आहे.तसेच ते आता राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे प्रदेश सरचिटणीस व घुंगराळा गावचे उपसरपंच  म्हणून काम करत आहेत.
    आजवर पक्षाने दिलेल्या सर्व जबाबदारी व काम एकनिष्ठ व प्रामाणिक पणे केलेले आहे. विद्यार्थी,युवक यांच्यासंबधी काम करत असतांना ग्रामीण भागातील शेतकरी,ग्रामीण विकास याबद्दल तळमळीने काम करणारा कार्यकर्ता म्हणून वसंत सुगावे यांची ओळख आहे.
    त्यांच्या निवडीबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री कमलकीशोरजी कदम साहेब,माजी आ. प्रदीप नाईक,शंकरअण्णा धोंडगे,प्रदेशसरचिटणीस हरिहरराव भोसिकर,रमेश देशमुख शिळवनीकर,प्रभारी जिल्हाध्यक्ष डाॅ. सुनिल कदम,राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष दिलीप धोंडगे,राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष श्रीकांत मांजरमकर आदिंनी अभिनंदन केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा