*लहुजी शक्ती सेना उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्याच्या विद्यार्थी आघाडीचे संयुक्त बैठक मुरूड येथे संपन्न,तर नवीन पदाधिकार्यांच्या निवडी.*
तुळजापूर प्रतिनिधी रुपेश डोलारे जिल्हा उस्मानाबाद
लहुजी शक्ती सेना उस्मानाबाद आणि लातूर या जिल्ह्यांमध्ये विद्यार्थी आघाडीच्या माध्यमातून संयुक्त बैठक मा. सोमनाथ भाऊ कांबळे यांच्या आदेशावरून अजय कांबळे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली मुरूड येथे आयोजित करण्यात आली होती.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, मातंग समाजाचा एकमेव आवाज म्हणून ओळखली जाणारी लहुजी शक्ती सेना या संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये मातंग समाजाला एकत्रित करण्याचे मोठे महान सामाजिक कार्य केले जात आहे. याच धर्तीवर महिला, युवक, विद्यार्थी, या सर्वच क्षेत्रांमध्ये लहुजी शक्ती सेना आपल्या आघाड्या उभा करून मातंग समाजाला सर्वच स्तरावर सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रामध्ये दखलपात्र करण्यासाठी अहोरात्र ,अविरत, अथकपणे कार्यरत आहे.
*लहुजी शक्ती सेना उस्मानाबाद चे जिल्हाध्यक्ष अमोल भाऊ सगट,लातूरचे विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष अनिकेत भाऊ कांबळे,यांच्या नियोजनाखाली हा कार्यक्रम मुरुड येथे आयोजित करण्यात आला होता.
या ठिकाणी लहुजी शक्ती सेना चे लातूर विद्यार्थ्या आघाडी तालुकाध्यक्ष म्हणून "अक्षयभाऊ वाघमारे" यांची निवड करण्यात आली तर उस्मानाबाद तालुका अध्यक्ष विद्यार्थी आघाडी या पदावर "वैभवभाऊ ऐडके" यांची निवड करण्यात आली.
या ठिकाणी निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांना वरीष्ठांकडून काम करण्याची माहिती , मार्गदर्शन, सूचना आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.आज मुरुड तालुका लातूर येथे अजय भाऊ कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक संपन्न झाली.
हा कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी लहुजी शक्ती सेना चे लातूर जिल्हा उपाध्यक्ष सतीशभाऊ मिसाळ, उस्मानाबाद विद्यार्थ्या आघाडी जिल्हाध्यक्ष अमोल भाऊ सकट, लातूरचे तालुकाध्यक्ष उद्धवभाऊ चव्हाण, मुरूड शहर अध्यक्ष अक्षयभाऊ चव्हाण, महेशभाऊ सोनपारखे, गणेशभाऊ चव्हाण, संतोषभाऊ हनुमंते, ज्ञानोबा कांबळे, महेशभाऊ चव्हाण आदी पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.
तसेच याप्रसंगी कार्यकर्ते आणि मोठ्या प्रमाणावर समाजबांधव, विद्यार्थी मित्र उपस्थित होते.
प्रतिनिधी रूपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा