Breaking

सोमवार, ५ ऑक्टोबर, २०२०

*संगीतसूर्य केशवराव भोसले सांस्कृतिक परिषदेची कार्यकारिणी जाहीर


*संगीतसूर्य केशवराव भोसले सांस्कृतिक परिषदेची कार्यकारिणी जाहीर*

नांदेड,प्रतिनिधी/बालाजी सिरसाट


संगीतसूर्य केशवराव भोसले यांच्या स्मृतिदिनानिमित्त मराठा सेवा संघ प्रणित, संगीतसूर्य केशवराव भोसले सांस्कृतिक परिषद जिल्हा नांदेड चि कार्यकारिणी जाहीर व नियुक्ती पत्र वाटप करण्यात आले. काल यशवंतराव चव्हाण मुलांचे वसतिगृहात संपन्न झालेल्या या कार्यक्रमात संगीत, कला, साहित्य, नाट्य व नृत्यामध्ये पारंगत असलेल्या उत्कृष्ठ व्यक्तींच्या नियुक्ती करण्यात आली. यावेळी राष्ट्रमाता जिजाऊ व केशवराव भोसले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला शिवव्याख्याते तथा संत गाडगेबाबा प्रबोधन कक्षाचे जिल्हाध्यक्ष गजानन जाधव यांनी सुरवात केली. यावेळी परिषदेचे प्रदेशाध्यक्ष वर्षाताई धाबे, कार्याध्यक्ष अनिल पाटील सर, महासचिव प्रमिलाताई भिसे, मराठवाडा विभागीय अध्यक्ष प्रकाश लेणेकर, मराठा सेवा संघाचे डॉ. गणेश शिंदे, सोपान मामा क्षीरसागर, शे रा पाटील, जिल्हाध्यक्ष नानाराव कल्याणकर, श्यामसुंदर शिंदे, विद्याताई पाटील, अरुणाताई जाधव, सतीश जाधव इत्यादीच्या हस्ते नियुक्ती पत्र वाटप करण्यात आले व परिषदेचे जिल्हाध्यक्ष डॉ. शिवराज शिंदे यांनी परिषदेची कार्यपद्धती समजाऊन सांगितली.
यावेळी खालील पदाधिकाऱ्यांनी नियुक्ती करण्यात आली. 
जिल्हाउपाध्यक्ष संजय जगदंबे, जिल्हाकार्याध्यक्ष जगनजी शेळके, जिल्हा सचिव प्रा. विनोद राणे, कोषाध्यक्ष अजय शेवाळे, सहसचिव सुधीर पळशिकर, मार्गदर्शक  प्रा. शिवदास शिंदे, अनंत पाटील, अनुपमा पाटील, प्रसिद्धी विभाग प्रमुख दत्ता पाटील मोरे, सूत्रसंचालन विभाग प्रमुख संगीता कदम, प्रा. बालाजी पतंगे, गायन विभाग प्रमुख विलास गारोळे, सच्चिदानंद डाखोरे, नृत्य विभाग प्रमुख युवराज शिंदे, शिव मुळे, वाद्य विभाग प्रमुख सचिन बोंपिलवार , नाट्य विभाग प्रमुख महेश घुंगरे, साहित्य विभाग प्रमुख धनंजय देशमुख, कला विभाग प्रमुख, तुकडोजी बोंडलेवाड, दिपा बोंडलेवाड, जिल्हा कार्यकारिणी सदस्य माधव मोरे, रंगराव शिंदे तालुकाध्यक्ष नांदेड दक्षीण साहेबराव पाटील पुयड नांदेड दक्षीण रोहिदास कदम अर्धापूर भागवत भोकरे हदगाव अवधूत पवार. इत्यादी पदाधिकाऱ्यांचि नियुक्ती करण्यात आली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा