उपजिल्हा रूग्णालयातील कोरोनाग्रस्तांना श्रमिक पञकार संघातर्फे वाटले बेडसीट डाॅ. शेळकेनी संघाचे मानले अाभार.
Aj 24Taas News Maharashtra
इंदापूर प्रतिनिधी :शिवाजी पवार
इंदापूर तालुका श्रमिक पत्रकार संघातर्फे इंदापूर उपजिल्हा रुग्णालयातील कोरोनाग्रस्त रुग्णांकरिता बेडसिटांचे वाटप अध्यक्ष सुरेश मिसाळ, कार्याध्यक्ष देवा राखुंडे व मुख्य सल्लागार राहुलजी ढवळे, जावेद मुलाणी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
उपजिल्हा रूग्णालयात कोरोनाग्रस्त रुग्णांसाठी बेडसिट नसल्याच्या बातम्या प्रसार माध्यमातून प्रसिध्द झाल्यानंतर याची गंभीर दखल अखेर पत्रकारांनीच घेतली व इंदापूर तालुका श्रमिक पत्रकार संघाच्या पदाधिकारी व सदस्यांच्या उपस्थितीत आज रोजी त्याचे वाटप देखील करण्यात आले. असून भविष्यात इंदापूर तालुक्यातील कोरोनाग्रस्तांसाठी ज्या काही गोष्टींची कमतरता आसेल त्या तात्काळ श्रमिक पत्रकार संघाच्या मार्फत उपजिल्हा रुग्णालयात देण्यात येतील असा विश्वास पत्रकार संघाचे अध्यक्ष सुरेश मिसाळ यांनी दिला.
यावेळी डाॅ.एकनाथ चंदणशिवे,डाँ.सुहास शेळके,अमोल पाटोळे व सर्व आरोग्य सेविका, श्रमिक पञकार संघाचे तालुकाध्यक्ष सुरेश मिसाळ, कार्याध्यक्ष देवा राखुंडे,सल्लागार राहुल ढवळे,जावेद मुलाणी, संघटक शिवाजी पवार,प्रसिद्धी प्रमुख विजय शिंदे,सदस्य इम्तिहाज मुलाणी, आबासाहेब उगलमोगले, समिर सय्यद,सिध्दार्थ मखरे,गणेश कांबळे, अहमद शेख आदी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा