*मंडप व साऊंड व्यवसायांना परवानगी* *न दिल्यास* *मातोश्रीवर आंदोलन ** *करणार* . *गणेश* **काळभोर*
AJ 24 Taas News Maharashtra
प्रतिनिधी रेडा शशिकांत सोनटक्के
रेडा ( ता. इंदापूर )प्रतिनिधी
कोविड (१९)मुळे अनेक महिन्यांपासून आमचा मंडप व साऊंड व्यवसाय
बंद असून आमच्यावर व संबंधित कामगार यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे
तरी शासनाने या व्यवसायाबाबत योग्य ते निर्णय नियम व अटी घालून व्यवसाय करण्यास त्वरित परवानगी द्यावी
शासनाने याबाबत वेळीच निर्णय न घेतल्यास येत्या काही दिवसांत मातोश्रीवर आंदोलन करण्याचा इशारा साऊंड लाईट मंडप जनरेटर व डेकोरेशन संघटनेचे
पुणे जिल्हा अध्यक्ष गणेश काळभोर यांनी निमगाव केतकी तालुका इंदापूर येथे स्नेहमेळाव्यात दिला.
पुणे जिल्हा अध्यक्ष गणेश काळभोर पुढे म्हणाले की
आम्ही साऊंड मंडप लाईट डेकोरेशन जनरेटरचा व्यवसाय हा बँकांचे कर्ज घेऊन सुरू केला आहे परंतु कोरोना मुळे व्यवसाय हा पूर्ण ठप्प झाला असून आमच्या कुटुंबावर या व्यवसायावर अवलंबून असणाऱ्या कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे आमच्याकडे बँकांचे पतसंस्थांचे कर्ज भरण्यास पैसे नाहीत.
आमच्या कामगारांचे कुटुंब चालणार कसे बँकांचे हप्ते भरायचे असा सवाल त्यांनी ह्या वेळेस उपस्थित केला शासनाने लग्न कार्यास पन्नास लोकांना परवानगी दिली आहे लग्न शुभ कार्यास समारंभ पार पाडण्याकरता आमचे केवळ तीनच लोक यामध्ये सहभागी होतात तरी शासनाने पूर्वीप्रमाणे व्यवसाय करण्यास परवानगी द्यावी हा निर्णय शासनाने वेळीच न घेतल्यास संबंधित महाराष्ट्र राज्यातील साऊंड व्यवसायांच्या गाड्यांसह मुंबई येथे मातोश्रीवर जाऊन आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला महाराष्ट्र राज्य असोसिएशन अध्यक्ष नितेश मोरे उपाध्यक्ष अनिल पाटील खजिनदार निरंजन आव्हाड कार्याध्यक्ष गोरख माने महाराष्ट्र राज्य साऊंड लाईट अँड जनरेटर असोसिएशन सल्लागार पिंटू शेठ देवकर सल्लागार योगेश बाबा कामठे अध्यक्ष नितेश मोरे उपाध्यक्ष अनिल पाटील संघटक गुड्डू भांबुरे पुणे जिल्हा असोसिएशन अध्यक्ष गणेश काळभोर अमोल आमले माळी धनाजी सलगर बाबासाहेब करके दादा पठाण सागर कसार योगेश गायकवाड उपाध्यक्ष गणेश सुभाष माने हे उपस्थित होते
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा