*गणेश करे पाटलांसारख्या संवेदनशील समाजसेवकांची समाजाला आत्यंतिक गरज- रोहित चौधरी*
*करे पाटलांच्या दातृत्वातून उपजिल्हा रुग्णालयाला मिळालेल्या 5 व्हील चेअर लोकार्पण कार्यक्रमात काढले गौरवोद्गार*
*अतुल वारे पाटील-करमाळा*
करमाळा येथील उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांची व्हील चेअर अभावी होणारी गैरसोय लक्षात येताच तात्काळ 5 व्हील चेअर उपलब्ध करून देणारे यशकल्याणी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष गणेश करे पाटील यांच्या सारख्या संवेदनशील मनाच्या सजसेवकाची समाजाला गरज असल्याचे प्रतिपादन पुणे विभागाच्या विशेष सुरक्षा विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहित चौधरी यांनी केले.
करमाळा येथील उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक डॉ अमोल डुकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.यावेळी प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ निलेश मोटे,डॉ राहुल कोळेकर ,शिवसेना माजी तालुकाध्यक्ष शाहू फरतडे, शिवा नरुटे,कैलास सुद्रीक उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना चौधरी म्हणाले की ,गणेश करे पाटील यांना रुग्णालयात येताना एका रुग्णाच्या व्हील चेअरचे चाक तुटलेले दिसले. ही असुविधा लक्षात येताच तात्काळ त्यांनी तब्बल 5 व्हील चेअर रुग्णालयाला उपलब्ध करून दिल्या. केवढी ही संवेदनशीलता ! आपण जीवन जात असताना असेच एखादे काम केले तर समाजामध्ये खूप मोठा आदर्श निर्माण होईल.समाजाला गणेश भाऊंसारख्या समाजसेवकांची गरज असून आपण सर्वांनी सामाजिक बांधिलकी जपत असेच उपक्रम राबवावेत असे त्यांनी आवाहन केले.
डॉ अमोल डुकरेंच्या वाढदिवसाच्या निमित्ताने एक संवेदनशील आणि हळव्या मनाचे गणेश भाऊ पहायला मिळाले , भाऊ ना खूप वेळा भेटलो पण प्रत्येक वेळी नवीन आणि आकर्षित करणारा स्वभाव गुण पहायला मिळाला , प्रत्येक वेळी वेगळा व्यक्तिमत्वा चा पैलू पाहून गणेश भाऊ बद्दल मनापासून आदर वाटतो .
गणेश भाऊ करे पाटील हे यशकल्याणी सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून विविध स्तरावर सामाजिक काम करत असतात त्यांनी आज पर्यंत करमाळा तालुक्यात खूप भरीव आणि अतुलनीय कामगिरी केली आहे . त्यांच्या हातून यापुढेही असेच कार्य होत राहील असा आशावाद त्यांनी यावेळी व्यक्त केला.
डॉ अमोल डुकरे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा