Breaking

मंगळवार, ६ ऑक्टोबर, २०२०

मराठा आरक्षणाला न्यायालयाने दिलेली स्थगिती उठवण्यासाठी सकल मराठा समाजाकडुन जिल्हाधिकारी यांना निवेदन*



*मराठा आरक्षणाला न्यायालयाने दिलेली स्थगिती उठवण्यासाठी सकल मराठा समाजाकडुन  जिल्हाधिकारी यांना निवेदन*


Aj 24Taas News Maharashtra*
*उस्मानाबाद - प्रतिनिधी, /प्रतिक भोसले, उस्मानाबाद*

मराठा समाजाच्या आरक्षणाला मिळालेल्या स्थगिती विरोधात उस्मानाबादमध्ये दि. ५ ऑक्टोबर रोजी सकाळी १०:३० वाजण्याच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयासोर जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आले. 
आरक्षणाला स्थगिती मिळाली असल्याने मराठा समाजामध्ये अस्वस्थतेची भावना आहे. त्यामुळे आरक्षण टिकून रहावे यासाठी सरकारने व लोकप्रतिनिधिंनी ठोस पावले उचलावी या कारणासाठी उस्मानाबाद (धाराशिव) मध्ये  जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले, व त्या संदर्भात जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर  यांना दहा मागण्यांचे निवेदनही देण्यात आले.

जो पर्यंत मराठा आरक्षणासंदर्भात ठोस निर्णय होत नाही तो पर्यंत कोणत्याही प्रकारची शासकीय भरती प्रक्रिया राबवू नका, पोलिस भरती स्थगित करा या सोबतच इतरही घोषणा करण्यात आल्या

मराठा समाजाचा आरक्षणासाठी अनेक वर्षांपासून संघर्ष सुरु आहे, वेळोवेळी आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरात मराठा समाजाने आरक्षण मिळवण्यासाठी प्रचंड मोठा त्याग केला आहे, आरक्षण मिळावे म्हणून लाखोंच्या संख्येने शांत, शिस्तबद्ध आणि संयमाने मोर्चे काढून यशस्वी केले आहेत. मात्र सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्याने अन्याय झाल्याची भावना मराठा समाजात असून राज्य सरकारविरुद्ध मोठी नाराजी निर्माण झाली असल्याने (सोमवार दि. ५ ऑक्टोबर रोजी) उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मराठा क्रांती मोर्चासह विविध संघटनांनी एकत्र येत केंद्र व राज्य सरकारचा निषेध नोंदवला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा