Breaking

मंगळवार, १३ ऑक्टोबर, २०२०

राजघराण्यातील व्यक्तीबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याबद्दल लोणंदमध्ये निवेदनातून निषेध


राजघराण्यातील व्यक्तीबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याबद्दल लोणंदमध्ये निवेदनातून निषेध

सुशिल गायकवाड/खंडाळा.

खंडाळा तालुका प्रतिनिधी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर आणि अ‍ॅड.गुणरत्न सदावर्ते यांनी राजघराण्यातील व्यक्तींवर आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी महाराष्ट्रात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला होता.याच अनुषंगाने लोणंद येथील
खा.श्री.छ.उदयनराजे भोसले युवा मंच यांच्या वतीने या विधानांचा निषेध व्यक्त करण्यात आलेला आहे. तसेच याबाबतचे निवेदन हे लोणंद पोलीस ठाण्यात सपोनि संतोष चौधरी यांच्याकडे देण्यात आलेले आहे.


दिलेल्या निवेदनात असे म्हटलेले आहे की,संपूर्ण महाराष्ट्राचे श्रद्धा व प्रेरणास्थान असलेल्या छत्रपती घराण्यातील व्यक्तींबद्दल प्रकाश आंबेडकर आणि गुणरत्न सदावर्ते यांनी श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले आणि श्रीमंत छत्रपती संभाजीराजे यांच्या बद्दल आक्षेपार्ह विधाने करून दोन्ही छत्रपती घराण्याचा अपमान केला आहे.
आक्षेपार्ह विधान केल्याबद्दल आम्ही त्यांचा जाहीर निषेध करीत असल्याचे मंचचे अध्यक्ष श्रीकांत सावंत यांनी निवेदनातून सांगितले आहे.तसेच याप्रकरणी प्रकाश आंबेडकर आणि गुणरत्न सदावर्ते यांनी तमाम महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागावी असे म्हटलेले आहे.या वेळी मंचचे अध्यक्ष श्रीकांत सावंत यांच्या सह गौरव काकडे, दत्ता भोईटे, रोहित यादव,शुभम काकडे आदी उपस्थित होते.
,,,,,

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा