मंगळवेढा येथील एस.एम.आवताडे कंपनीला 31 कोटी 62 लाखाचा दंड माळशिरस तहशिदार जगदिश निंबाळकर यांची कारवाई मुरुम उपासा करणाऱ्याचे धाबे दणाले
माळशिरस:प्रतिनिधी -
बहुचर्चित अवैध गौणखनिज(मुरूम)उत्खनन प्रकरणी श्री.एस.एम.आवताडे प्रा.लि.मंगळवेढा या कंन्स्ट्रक्शन कंपनीला सुमारे 31कोटी,62लाख तीन हजार आठशे रुपयांचा दंड करण्यात आला आहे.दि.13 नोव्हेंबर रोजी माळशिरसचे तहसिलदार जगदिश निंबाळकर यांनी दंडात्मक कारवाईचे आदेश पारीत केले आहेत.युवासेना माळशिरस तालुका यांचे अंदोलनाला यश मिळाले आहे.
मौजे-खळवे,ता.माळशिरस येथील गट नं.-152/2-ब,329/3-ब,120/1,154/2,154/1 जमिनक्षेत्र गटांमधुन आवताडे कंपनीने विनापरवाना कोणतीही राॅयल्टी न भरता मुरूम उत्खनन करून शासनाचा महसुल बुडविल्याबाबतचे तक्रारी माळशिरस तालुका युवा सेना यांनी दिले होते. तसेच दोन दिवस अकलूज प्रांताधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे अंदोलन केले होते. या अंदोलनाची दखल घेत भूमि अभिलेखतर्फे एटीएस.मशीनद्वारे अचुक मोजणी करून फेरपंचनामे करण्यात आले.मा.तहसिलदार माळशिरस यांनी याबाबत संबंधितांना नोटीस देवुन तात्काळ खुलासा करण्याचे सुचित केले होते.परंतु कंपनीने सादर केलेला खुलासा अमान्य करीत तहसीलदार यांनी दंडात्मक कारवाई केली आहे.सात दिवसांत कंपनीला ठोठवलेला महसुल भरपाई करण्याचे कळविले आहे.
एकुण सहा गटांपैकी चार गटांतील 30,404 ब्रास मुरूम उत्खनन केल्यामुळे 31कोटी दंड आकारण्यात आला असुन उर्वरित दोन गटांतील उत्खननबद्दल अंदाजे किमान 14 कोटी दंड आकारण्यात येणार आहे. नुतन तहसिलदार जगदिश निंबाळकर यांनी पदभार स्विकारल्यानंतरची केलेली ही सर्वांत मोठी कारवाई आहे.या अंदोलनात सहभागी व सहकार्य करणारे पदाधिकारी,संघटना व कार्यकर्ते यांचे माळशिरस तालुका युवा सेना आभार माणले.
आमच्या अंदोलनाच्या दरम्यान सत्ताधारी पक्षाच्या पदाधिका-यांची नौटंकी कशासाठी अशा वल्गना करण्यात आल्या होत्या.परंतु हे अंदोलन शासनाविरूद्ध नसुन प्रशासन व महसुल बुडविणा-यांविरूद्ध होते.मग तो कोणीही असो,या कारवाईमुळे शासनाला जबरदस्त महसुल मिळाला आहे.यापुढेही तालुक्यात विनापरवाना,अवैध मुरूम उत्खनन होवु देणार नाही.जे.एल.म्हात्रे कन्स्ट्रक्शन कंपनीचीही माहिती मागवली असून त्यांनीही असेच गौणखनिज उत्खनन करून महसूल बुडविला आहे,त्यामुळे त्याही कंपनीला दंड होईपर्यंत पाठपुरावा करणार आहोत
या कारवाईमुळे माळशिरस तालुक्यातील अवैध धंदे वाल्यांचे धाबे दणाणले असून अशीच कारवाई सोलापूर जिल्ह्यातील अनेक मुरूम उपसा करणाऱ्या वरती होणार का असा संवाद सोलापूर जनतेतून होत आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा