Breaking

शुक्रवार, १३ नोव्हेंबर, २०२०

विठ्ठलवाडीचा शिवम गुंड 5 वी शिष्यवृत्ती परीक्षेत मोहोळ तालुक्यात दुसरा



विठ्ठलवाडीचा शिवम गुंड 5 वी शिष्यवृत्ती परीक्षेत मोहोळ तालुक्यात दुसरा


माढा / प्रतिनिधी- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने फेब्रुवारी 2020 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता 5 वीच्या गुणवत्ता शिष्यवृत्ती परीक्षेत माढा तालुक्यातील विठ्ठलवाडी येथील शिवम सुधीर गुंड याने 288 पैकी 256 गुण प्राप्त करून ग्रामीण विभागात मोहोळ तालुक्यात दुसरा तर सोलापूर जिल्ह्यात 19 क्रमांक पटकावित शासनाच्या शिष्यवृत्ती साठी पात्र ठरला आहे.

शिवम गुंड हा जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा शेटफळ या शाळेतील विद्यार्थी असून त्यास भाषा व गणित विषयात 138 पैकी 126 व इंग्रजी व बुद्धीमत्ता विषयास 150 पैकी 130 गुण मिळाले आहेत.त्यास वर्गशिक्षिका रजिया तांबोळी,विठ्ठल पवार,मनिषा थोरात,संतोष लोंढे,संगिता पाटील व मुख्याध्यापिका उमा गुंड यांचे मार्गदर्शन लाभले.तो विठ्ठलवाडीचे प्राथमिक शिक्षक सुधीर गुंड व प्राथमिक शिक्षिका माधुरी गुंड यांचा मुलगा आहे. 

यशाबद्दल त्याचे अभिनंदन जिल्हा परिषद सदस्य रणजितसिंह शिंदे, पोलीस उपअधीक्षक सचिन कदम, समाजकल्याण अधिकारी संतोष जाधव,गटशिक्षणाधिकारी सिद्धेश्वर निंबर्गी,मारुती फडके,विस्ताराधिकारी विकास यादव,बंडू शिंदे,मेजर एकनाथ वागज,आदर्श मुख्याध्यापक बाळू गुंड,उपशाखाप्रमुख मोहन कदम, चेअरमन अनिलकुमार अनभुले, सरपंच अरुण कदम,उपसरपंच अनिलकुमार बरकडे,तंटामुक्ती अध्यक्ष अरुण मोरे,डॉ.संतोष कदम, डॉ.नेताजी कोकाटे,मुख्याध्यापक शिवाजी तळेकर,रघुवीर पासले, कृषी पर्यवेक्षक संतोष सुर्वे,आदर्श शिक्षक राजेंद्र गुंड,वाचनालयाचे अध्यक्ष रामचंद्र भांगे,डॉ.मोहन शेगर,नेताजी उबाळे,दिनेश गुंड,समाधान कोकाटे, सज्जन मुळे, सतीश गुंड,भिवाजी जाधव यांच्यासह शिक्षक व शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा