माढा,पंढरपूर व माळशिरस तालुका पीक नुकसानीपोटी 94 कोटी 48 लाखांचे अनुदान - आ. बबनदादा शिंदे
चार दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान जमा करण्याची प्रक्रिया सुरू होणार
माढा / प्रतिनिधी- राजेंद्र गुंड सर
- ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे माढा,पंढरपूर व माळशिरस तालुक्यातील शेतातील उभी पिके व फळबागांचे अतोनात नुकसान झाले होते त्या नुकसान झालेल्या पिकांचे व फळबागांचे पंचनामे प्रशासनाने करून अहवाल शासनाला सादर केला होता त्या नुकसान भरपाईपोटी शेतकऱ्यांना अनुदान म्हणून शासनाकडून माढा तालुक्याला 27 कोटी 48 लाख, पंढरपूर तालुक्यासाठी 55 कोटी व माळशिरस तालुक्यासाठी 12 कोटी रुपये असे एकूण 94 कोटी 48 लाख रुपयांचा पहिला टप्पा संबंधित तहसील कार्यालयात जमा झाला असून येत्या चार ते पाच दिवसांत अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्याची प्रक्रिया सुरू होणार असल्याची माहिती आमदार बबनदादा शिंदे यांनी दिली आहे.
माढा,पंढरपूर व माळशिरस तालुक्यात अनेक ठिकाणी सरासरी 100 मिलिमीटर पेक्षा जास्त पाऊस पडला होता.या भयंकर अतिवृष्टीमुळे विशेषतः सिना व भिमा नदीच्या काठावरील गावातील आणि ज्या भागात मोठ्या प्रमाणात ओढे-नाले भरून पाणी वाहिले त्या ठिकाणची पिके पाण्याबरोबर वाहून गेली व फळबागांचे ही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तसेच काही ठिकाणी सुपीक जमिनीचा मातीचा वरचा थर पूर्णपणे वाहून गेला काही शेतकऱ्यांची शेततळी फुटली तर काही जणांच्या रोपवाटिका वाहून गेल्या काही भागातील घरांची व दुकानांची पडझड झाली असून वाहत्या पाण्यावर जनावरे,शेळ्या मेंढ्या,कोंबड्या व कृषी पंप आणि साहित्य वाहून गेल्याने शेतकरी व सर्वसामान्य जनतेचे अतोनात नुकसान झाल बाबतचे पंचनामे अहवाल शासनाकडे सादर केला होता त्यानुसार शासनाने अनुदानाचा पहिला टप्पा त्वरित शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याच्या हेतूने दिला असून येत्या चार ते पाच दिवसांत माढा तहसील प्रशासनाच्या माध्यमातून हे वाटप केले जाणार असल्याचेही आ.बबनराव शिंदे यांनी सांगितले आहे.
माढा विधानसभा मतदारसंघातील पंढरपूर, माढा व माळशिरस तालुक्यात अतिवृष्टी मुळे नुकसान झालेल्या पिकांचे व फळबागांची पाहणी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार,आमदार बबनदादा शिंदे व जिल्हा परिषद सदस्य रणजितसिंह शिंदे यांनी करून तातडीने प्रशासनाला पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या होत्या त्यानुसार प्रशासनाने त्वरित कार्यवाही करून अहवाल सादर केला होता त्यानुसार अनुदानाचा पहिला हप्ता संबंधित तालुक्यासाठी राज्य शासनाकडून मंजूर झाला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा