Breaking

रविवार, १५ नोव्हेंबर, २०२०

यशवंतराव चव्हाण महाविद्यालय पतसंस्थेची चौकशी अप्पर लेखापरिक्षकांमार्फत होणार*- *प्रा गोवर्धन चवरे पाटील**



*यशवंतराव चव्हाण महाविद्यालय पतसंस्थेची चौकशी अप्पर लेखापरिक्षकांमार्फत होणार*- *प्रा गोवर्धन चवरे पाटील*


*करमाळा तालुका प्रतिनिधी-अतुल वारे पाटील*
   यशवंतराव चव्हाण महाविद्यालय सेवकांची पतसंस्था  मर्यादित करमाळा या पतसंस्थेच्या गैरकारभाराची भ्रष्टाचाराची चौकशी होऊन या प्रकरणाची या संस्थेवर प्रशासकाची नेमणूक करण्याच्या मागणीनुसार सदर पतसंस्थेची चौकशी  अप्पर लेखपरिक्षक संतोष दीक्षित यांनी करण्याचे निर्देश जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था सोलापूर यांनी दिल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष प्राध्यापक गोवर्धन चवरे यांनी दिली.
     याबाबत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष प्राध्यापक गोवर्धन चवरे पाटील म्हणाले की, यशवंतराव चव्हाण महाविद्यालय सेवकांची पतसंस्था करमाळा या संस्थेच्या गैरकारभाराची व भ्रष्टाचाराची चौकशी होऊन संचालक मंडळ बरखास्त करण्याची मागणी आपण सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था पुणे यांच्या कार्यालयाकडे केली होती.त्यानुसार जिल्हा विशेष लेखापरीक्षक वर्ग-1 सहकारी संस्था सोलापूर यांना जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने चौकशी करून अहवाल सादर करण्याचे  पत्र दिले होते. त्यानुसार चौकशीमध्ये विलासराव घुमरे नागरी पतसंस्था व यशवंतराव चव्हाण महाविद्यालय सेवकांची पतसंस्था यापैकी विलासराव घुमरे पतसंस्थेच्या चौकशीमध्ये मी मांडलेल्या सर्व मुद्द्यांचा शासकीय ऑडिटर परमेश्वर मुंडे यांनी उल्लेख केला नाही तसेच या पतसंस्थेचे दप्तर परमेश्वर मुंडे यांच्या शिवाय सहाय्यक निबंधक करमाळा, डी डी आर सोलापूर ,विभाग सहनिबंधक पुणे यांनी पाहिले नाही तसेच मलाही दाखवली नाही. तसेच 28 /10 /2020 रोजीच्या संस्थेच्या चौकशीत  सचिव व चेअरमन यांना दप्तर घेऊन येण्यास सांगितले असतानासुद्धा त्यांनी दप्तर आणले  नाही ,त्यामुळे संस्थेमध्ये गैरकारभार असल्याचे दिसून येत असल्यामुळे या पतसंस्थेच्या संचालक मंडळावर 148( कलम 3) नुसार चौकशी व्हावी यासाठी दोन नोव्हेंबर रोजी सहकार आयुक्त कार्यालय समोर मी उपोषण केले. तसेच या प्रकरणाची चौकशी करमाळ्याच्या सहाय्यक निबंधक यांना न  देता अप्पर लेखापरीक्षक सहकारी संस्था सोलापूर यांच्याकडे देण्याची मागणी केली होती. त्यानुसार जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था सोलापूर यांनी सदर पतसंस्थेचे चौकशी संतोष दीक्षित ,अप्पर लेखापरीक्षक सहकारी संस्था सोलापूर यांनी करण्याची शिफारस जिल्हा उपनिबंधक सोलापूर यांनी केली आहे. तसेच यशवंतराव चव्हाण महाविद्यालय सेवकांची पतसंस्था या संस्थेच्या दप्तराची माझ्या तक्रार अर्जातील मुद्द्यांच्या अनुषंगाने चौकशी करून पंधरा दिवसाच्या आत अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले असल्याची माहिती प्रा गोवर्धन चवरे पाटील यांनी दिली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा